सातारा 

‘एटीसी’ने जप्त चार तलवारीसह ११ धारधार शस्त्रे

​सातारा (अभयकुमार देशमुख) :

शहरातील वर्दळीच्या ठिकाणावरून दहशतवादी विरोधी पथकाच्या सेलने (एटीसी) सुमारे 4 तलवारीसह 11 धारधार इतर हत्यारे जप्त केली. सातारा शहरात गुरुवारी (दि. 29) रात्री 9 च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. शहरातील दिव्यनगरी ते कोंडवे रोडवरील या घटनेने नागरिकांच्यात भितीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी सातारा शहरात संशयास्पद फिरणाऱ्या सचिन बाळू चव्हाण (रा. आकाशवाणी झोपडपट्टी) असे ताब्यात घेतलेल्या युवकाचे नाव आहे.याबाबत प्राथमिक माहिती अशी, गुरुवारी रात्री एटीसीचे पथक साताऱ्यात गस्त घालत होते.

यावेळी एकजण संशयास्पद परिस्थितीत फिरताना आढळला. यानंतर पोलिसांनी त्याला अडवून कसून चौकशी केली असता त्याच्याकडे अनेक हत्याराचे कोठार असल्याचे समजले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडील 11 धारदार हत्यारे जप्त केली आहेत. आरोपीकडे सातारा पोलिस अधिक चौकशी करत आहेत.

संशयितांकडे पोत्यात तलवारीसह 7 कोयतेही सापडले आहेत. या शस्त्रांची किंमत 18 हजार 500 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, पो.नि. विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनखाली स.पो.नि शिवाजी विभुते, भोसले यांनी ही कारवाई केली आहे. अशा घटना वाढल्याने नागरिकांच्यात भितीचे वातावरण पसरले आहे.​

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: