गोवा 

‘आमचे सरकार आले तर मिळणार २४ तास वीज, पाणी आणि रोजगार’

पेडणे (प्रतिनिधी) :

तालुक्यातील राखीव मतदार संघाचे मागची वीस वर्षे प्रतिनिधित्व करूननही पाण्याची समस्या उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर याना सोडवता येत नसेल तर आता जनतेने आमदार आणि सरकार बदलण्याची हि योग्य वेळ आहे ,आणि मगोचे सरकार आले तर अगोदर पेडणे मतदार संघात चोवीस तास पाणी वीज आणि स्थानिकाना रोजगार व्यवसाय देण्यासाठी प्राधान्य दिले जाईल अशी ग्वाही पेडणे मगोचे नेते प्रवीण आर्लेकर यांनी कोरगाव येथे स्थानिक पत्रकारांकडे बोलताना दिली .

चांदेल येथील पाणी प्रकल्पातून येणारे पाणी पुरवठ्यावर वारंवार व्यत्यय  येत आहे , पूर आला कि पाणी गायब , कळणे येथील खाण कोसळली तरीही चांदेल पाणी प्रकल्पावर विपरीत परिणाम होत आहे.  त्याविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना मगो नेते प्रवीण आर्लेकर उत्तर देत होते .

प्रवीण आर्लेकर यांनी सांगितले कि ज्या दिवशी तिळारी धरणाचे पाणी सोडले व सोडणार याची जाणीव या मतदार संघाचे आमदार आणि उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर याना माहिती असायला हवी होती , या पुरामुळे जी पाण्याची गैरसोय झाली त्यावर पर्यायी व्यवस्था आमदार या नात्याने त्यांनी करायला हवी होती , ते अपयशी ठरले , लोकप्रतिनिधीला जमत नसेल तर त्यांनी सांगावे आम्ही पाण्याची समस्या सोडवू शकतो . पाणी सोडणार म्हणून कळवूनही पाणी विभागाने ते पंप वरती काढून ठेवायला हवे होते ते ठेवले नाही परिणामी त्या चंदेल पाणी प्रकल्पाच्या पंपापर्यंत पाणी पोचून ते पाण्याखाली गेले आणि दोन दिवस नव्हे तर चारदिवस पाणी आणि आता पुन्हा परत पाण्याची समस्या निर्माण झाली त्यावर अजूनपर्यंत सरकारने पर्यायी व्यवस्था केली नाही सरकार झोपा काढत आहे असा दावा आर्लेकर यांनी केला .

जनतेला पाणी वाढवण्याची क्षमता असताना अतिरिक्त पप्रकल्पाचे  भूमिपुजन झाले त्याचा आजपर्यंत उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी पाठपुरावा का केला नाही असा प्रश्न प्रवीण आर्लेकर यांनी उपस्थित केला . उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर हे केवळ नारळ फोडण्यासाठी प्रसिद्ध आहेत , ज्या प्रकल्पांचे नारळ फोडले त्या कामाची सुरुवात तरी झाली कि नाही हे त्यांनी तपासून पाहण्याचे आवाहन केले .

आमदाराला आता   बदलण्याची गरज आहे . आणि ते काम पेडणेकर करतील असा दावा आर्लेकर यांनी उपस्थित केला , कळणे माईन कोसळल्यानंतर परत एकदा पाण्याची गैरसोय झाली , त्यावर आमदाराने आणि सरकारने काहीच उपाय योजना केली नसल्याचा दावा केला .

यावेळी माजी सरपंच सुदीप कोरगावकर , मगो प्रवक्ते उमेश तळवणेकर , नरेश कोरगावकर उपस्थित होते .

उमेश तळवणेकर

मगोचे प्रवक्ते उमेश तळवणेकर यांनी बोलताना उपमुख्यमंत्री  बाबू आजगावकर हे मौनी बाबा आहेत , ते काही बोलत नाही , मात्र कार्यालयात बसून त्याचे कर्मचारी ज्ञानेश्वर परब हे बसून कुणाच्याही नावाने पत्रके काढतात , आणि कुणाचाही नावावर खपवतात , असा दावा उमेश तळवणेकर यांनी केला . बाबू आजगावकर हे स्वताच्या गाडीतून येत नाहीत सरकारचा येतात किंवा एम व्ही. आर कंत्राटदराने दिलेल्या वाहनाने येतात त्यामुळे रस्त्यांच्या खड्ड्यातील धक्के त्यांच्या मालकीच्या वाहनांना बसत नाही तर सरकारी वाहनाना बसतो , मगोने रस्त्याविषई आंदोलन केले तर बाबूंच्या नाकाला मिरच्या झोबतात  असा दावा उमेश तळवणेकर यांनी यावेळी केला .

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: