क्रीडा-अर्थमत

‘देवयानी’चा आयपीओ ४ रोजी होणार खुला

मुंबई :
देवयानी इंटरनॅशनल लिमिटेड हे भारतातील यम ब्रँड्सचे सर्वात मोठे फ्रान्चायझी आहेत आणि  नॉन-एक्स्क्लुसिव्ह बेसिसवर भारतातील जलद सेवा रेस्टॉरंट साखळीचे सर्वात मोठे ऑपरेटर (स्रोत – ग्लोबल डेटा रिपोर्ट) आहेत. ते पिझ्झा हट, केएफसी आणि कॉस्टा कॉफी स्टोअर्स तसेच वांगो, फूड स्ट्रीट, मसाला ट्विस्ट, आइल बार, अमरेलि आणि क्रश ज्युस बार या इतर ब्रँड्सची स्टोअर्स ऑपरेट करतात.  या कंपनीने बुधवार 04 ऑगस्ट 2021 रोजी त्यांच्या इक्विटी शेअर्सचे (ऑफर) पब्लिक ऑफरिंग करण्याचा प्रस्ताव दिला आहे. ही ऑफर 06 ऑगस्ट 2021 रोजी बंद होणार आहे. या ऑफरसाठी प्रति इक्विटी शेअर रु.86 – रु.90 हा प्राइस बँड निर्धारीत करण्यात आला आहे.

कंपनी आणि सेलिंग शेअरहोल्डर्स लीड मॅनेजर्सच्या सल्ल्याने सिक्युरिटी अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या (इश्यु ऑफ कॅपिटल अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) सुधारित नियम, 2018 (सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्स) नुसार अँकर गुंतवणूकदारांच्या सहभागाविषयी विचार करू शकतात. अँकर गुंतवणूकदारांचा बिड/ऑफर कालावधी बिड/ऑफर खुली होण्याच्या तारखेच्या एक दिवस आधीचा कार्यालयीन दिवस असेल.

आयपीओमध्ये कंपनीच्या एकूण रु.4,400 दशलक्ष रकमेचा फ्रेश इश्यु (फ्रेश इश्यु) आणि डनअर्न इन्व्हेस्टमेंट्स (मॉरिशस) पीटीई. लि., (इन्व्हेस्टर सेलिंग शेअरहोल्डर) आणि आरजे कॉर्प लिमिटेड हे प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डर (प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डर आणि आणि इन्व्हेस्टर सेलिंग शेअरहोल्डरसह, सेलिंग शेअरहोल्डर्स आणि अशा सेलिंग शेअरहोल्डर्सकडून ऑफर करण्यात आलेले इक्विटी शेअर्स म्हणजे “ऑफर फॉर सेल”) यांच्या 155,333,330 इक्विटी शेअर्सपर्यंतच्या विक्रीची ऑफर समाविष्ट आहे. या ऑफरमध्ये कंपनीच्या कंपनीच्या पात्र कर्मचाऱ्यांकडून (कर्मचारी आरक्षण पोर्शन) करण्यात आलेल्या सबस्क्रिप्शनसाठी 550,000 इक्विटी शेअर्सचे आरक्षण समाविष्ट आहे. कर्मचाऱ्यांसाठी आरक्षित असलेला भाग वजा करून राहिलेल्या ऑफरला नेट ऑफर असेल संबोधले आहे.

ही ऑफर सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्सच्या रेग्युलेशन 31 सह सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट्स (रेग्युलेशन्स) नियम, 1957 नियम 19(2) नुसार देण्यात आली आहे. ही ऑफर सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्सच्या रेग्युलेशन 6(2) नुसार करण्यात आली आहे. ही ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेच्या माध्यमातून करण्यात आली असून क्वालिफाइड इन्स्टिट्युशनल बायर्सना (क्यूआयबी, क्यूआयबी पोर्शन) प्रपोर्शनेट बेसिसवर करण्यात येणारे वाटप नेट ऑफरच्या 75% पेक्षा कमी नसेल. आमची कंपनी आणि सेलिंग शेअरहोल्डर्स लीड मॅनेजर्सच्या सल्ल्याने सेबी आयसीडीआर नियमानुसार स्वेच्छाधिकारात अँकर गुंतवणूकदारांना क्यूआयबी पोर्शनच्या 60% हिश्शाचे वाटप करतील (अँकर गुंतवणूकदार पोर्शन), याच्यावर वरील वाटप अधीन असेल. यापैकी एक तृतियांश हिस्सा स्थानिक म्युच्युअल फंडांसाठी आरक्षित असेल, जो अँकर गुंतवणूकदार वाटप किमतीएवढ्या किंवा त्याहून अधिक स्थानिक म्युच्युअल फंडांकडून प्राप्त होणाऱ्या वैध बोलींच्या अधीन असेल. त्याचप्रमाणे क्यूआयबी पोर्शनच्या 5% (अँकर गुंतवणूक हिस्सा वगळून) (नेट क्यूआयबी पोर्शन) फक्त म्युच्युअल फंडांसाठी प्रपोर्शनेट बेसिसवर वाटपासाठी उपलब्ध असेल आणि त्यातून शिल्लक राहिलेला निव्वळ क्यूआयबी पोर्शन म्युच्युअल फंडांसह सर्व क्यूआयबींना प्रपोर्शनेट बेसिसवर वाटपासाठी उपलब्ध असेल, जो ऑफर किमतीला किंवा त्याहून जास्त वैध बोली पाप्त होण्यावर अवलंबून असेल. पण म्युच्युअल फंडांकडून आलेली एकूण मागणी नेट क्यूआयबी पोर्शनच्या 5%हून कमी असेल तर म्युच्युअल फंड पोर्शनमध्ये उपलब्ध असलेले वाटपासाठीचे शिल्लक इक्विटी शेअर्स क्यूआयबीना प्रपोर्शनेट वाटपासाठी नेट क्यूआयबी पोर्शनमध्ये अॅड करण्यात येतील.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: