गोवा 

​कॉंग्रेसची रविवारी साखळीत ‘सद्बुद्धी यात्रा’

पणजी :
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सांवत यांनी विधानसभेत केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून प्रदेश कॉंग्रेस पक्षाने मुख्यमंत्र्या​ना त्यांच्या पदाच्या जबाबदारीची जाणीव करुन देण्यासाठी  रविवार दि. १ ऑगस्ट २०२१ रोजी संध्याकाळी ५ वाजता मुख्यमंत्र्यांच्या साखळी येथिल निवासस्थानी “सद्बुद्धी यात्रा” आयोजित केली असल्याची माहिती कॉंग्रेसचे माध्यम प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी दिली. ‘सद्बुद्धी यात्रेचे नेतृत्व कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर व विधीमंडळ गट नेते दिगंबर कामत करणार आहेत.

कॉंग्रेसचे कार्यकर्ते मु्ख्यमंत्र्यांचे डोके ठिकाणावर यावे म्हणुन त्यांना फुले भेट देणार असुन, त्यांना आपल्या  पदाच्या जबाबदारीची जाणीव व्हावी म्हणुन मेणबत्त्या पेटवणार आहेत अशी माहिती अमरनाथ पणजीकर यांनी दिली.

 

गोवा राज्याच्या भल्याचा विचार करुनच कॉंग्रेस पक्षाने शांततापुर्ण व अहिंसक मार्गाने ‘सद्बुद्धी यात्रे’च आयोजन केले असुन, मुख्यमंत्र्यांनी जबाबदारीने वागणे व जनतेला सुरक्षा देणे ही सरकारची जबाबदारीच नव्हे तर कर्तव्य असल्याची जाणीव डॉ. प्रमोद सावंताना करुन देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. लोकांनीच त्यांच्या सुरक्षेचे उपाय घ्यावेत असा सल्ला देणाऱ्या मुख्यमंत्री सावंताना पदावर राहण्याचा नैतिक अधिकारच नाही.
pramod sawant

भाजप  सरकारचे कायदा मंत्री निलेश काब्राल यांनी काही दिवसांपुर्वी नव दांपत्याना ‘समुपदेशन’ करण्याचा प्रस्ताव मांडला होता. भाजप सरकारने मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री तसेच भाजपचे पदाधिकारी यांच्यासाठी त्यांच्या घटनात्मक, व सामाजीक जबाबदाऱ्यांची जाणीव करुन देण्यासाठी समुपदेशन करणे गरजेचे आहे. लोकांना सुरक्षितता देणे व लोकभावनांचा आदर करणे हे भाजपवाल्यानी शिकणे गरजेचे आहे असा टोला अमरनाथ पणजीकर यांनी हाणला आहे.

 

गोव्यात झालेल्या दोन मुलींवरील बलात्कार प्रकरणांनंतर पालक व मुलांना जबाबदार धरणाऱ्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतानी ताबडतोब जनतेची जाहिर माफी मागावी अशी आम्ही परत एकदा मागणी करतो. भाजप सरकार कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यास अपयशी ठरल्यानेच आता राज्यात बलात्कार, खून, गोळीबार असे प्रकार दिवसाढवळ्या घडू लागले आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: