गोवा 

‘मी केवळ काळजीपोटी बोललो!’

​​पणजी​ :

25 जुलैच्या रात्री बाणावली समुद्रकिनाऱ्यावर दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या बलात्कार प्रकरणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केलेल्या विधानावरून मोठा वाद निर्माण झालाय. विविध स्तरातून मुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड उठलीये. यावर आपली बाजू मांडताना मुख्यमंत्र्यांनी ट्विट ​केले आहे​.

​बाणावली बलात्कारप्रकरणावरुन पालकांच्या जबाबदारीबाबत केलेल्या माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. या घटनेनं मीही व्यथित झालो आहे. बलात्काराचा गंभीर गुन्हा केलेल्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी, यासाठी गोवा पोलिसांसह गोवा सरकारही कटीबद्ध आहे. अल्पवयीन मुलांना वडीलधाऱ्यांनी अधिक सजग राहून आणि जबाबदारीनं मार्गदर्शन करत राहण्याची गरज या घटनेमुळे अधोरेखित झाली आहे. हेच सांगण्याता मी प्रयत्न केला. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला असून राज्यातील सर्व मुलांबाबत वाटत असलेल्या काळजी आणि प्रेमापोटी मी बोललो होतो, असं मुख्यमंत्र्यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: