गोवा 

कॉंग्रेस अध्यक्षांची पर्तगाळ मठाला भेट व स्वामीजींचे दर्शन

काणकोण/पर्तगाळी​ :

​​गोवा प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी आज श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळ मठाला भेट देवून श्रीमद् विद्याधीशतीर्थ स्वामी महाराजांच्या चातुर्मास व्रत स्विकार सोहळ्याला उपस्थिती लावली व त्यांचे आशिर्वाद घेतले. कॉंग्रेसचे यूवा नेते युरी आलेमांव, सरचिटणीस जनार्दन भांडारी, दया पागी तसेच काणकोण गट अध्यक्ष प्रलय भगत त्यांच्यासोबत हजर होते.

श्री रामदेव वीरविठ्ठल तसेच श्रीमद् विद्याधीराजतीर्थ स्वामीजींच्या समाधींचे दर्शन घेवून त्या सर्वांनी श्री विद्याधीश स्वामीजींकडुन फल मंत्राक्षता घेतल्या.

श्रीमद् विद्याधीशतीर्थ स्वामीजींनी सर्वांना आशिर्वाद देत, समाजासाठी निस्वार्थीपणे काम करण्याचा सल्ला दिला व लोकसेवेचे फळ नेहमी चांगलेच मिळते असे सांगीतले.

पांचशे वर्षांचा इतिहास असलेल्या मठास भेट देवून स्वामीजींचे आशिर्वाद घेणे माझे भाग्य आहे असे गिरीश चोडणकर म्हणाले.

माझ्या आयुष्यातला हा अविस्मरणीय दिवस असल्याचे यूवा नेते युरी आलेमांव म्हणाले.

मठ समितीचे उपाध्यक्ष आर आर कामथ व सचिव अनील पै यांनी सर्वांचे स्वागत केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: