गोवा 

‘आमदाराने ठेवला मांद्रे मतदारसंघ गहाण’

​विजय​ सरदेसाई यांची थेट टीका ​

​​पेडणे ​(निवृत्ती शिरोडकर​) :
मैत्रीच्या दिनी मांद्रे मतदार संघातील जनतेकडे गोवा फॉरवर्ड पक्ष मैत्री आणि आमदार निवडून आणण्यासाठी आजच्या दिनी मांद्रे मतदार संघातून प्रचाराला सुरुवात केली आहे . मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांनी मांद्रे मतदार संघ गहाण ठेवला आहे , त्याला  रोखण्यासाठी गोवा फॉरवर्ड कार्यरत आहे असे ​​प्रतिपादन , गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते तथा आमदार विजय सरदेसाई यांनी पार्से श्री भगवती मंदिर येथे मांद्रेचे गोवा फॉरवर्ड चे उमेदवार दीपक कलंगुटकर यांच्या प्रचाराचा श्रीफळ ठेवून शुभारंभ १ रोजी केला त्यावेळी ते स्थानिक पत्रकारांकडे बोलत होते .

यावेळी मांद्रेचे उमेदवार दीपक कलंगुटकर , उषा सरदेसाई ,दुर्गादास कामत , पेडणेचे उमेदवार जितेंद्र गावकर , शेखर पार्सेकर , निलेश कलंगुटकर , पंच अरुण पार्सेकर, गणपत कलंगुटकर , श्री घाडगे आदी उपस्थित होते .

सुरुवातीला प्रथमच मांद्रे मतदार संघाचा दौरा करत असल्यामुळे नागरिकातर्फे शाल श्रीफळ आणि तैलचित्र देवून आमदार विजय सरदेसाई याचा माजी सरपंच गणपत कलंगुटकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .

​​भाजपाकडे कदापही सोयरिक नाही
आमदार विजय सरदेसाई याना पत्रकारांनी भविष्यात तुम्ही सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपकडे युती करणार का असा प्रश्न विचारला असता , या पुढे कधीच भाजपाकडे युती करणार नाही असे स्पस्ट केले .

आमदार विजय सरदेसाई यांनी बोलताना मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांनी मांद्रे मतदार संघ गहाण ठेवलेला आहे , आमदारकी विकणाऱ्या आमदाराला परत जनता संधी देणार नाही . मतदार संघ विकण्याचे काम तुमच्या आमदाराने केले , आता गोवा वाचवण्यासाठी भूमिपुत्रासाठी जमिनी आणि गोवा सुरक्षित ठेवण्यासाठी भाजपला सत्त्येपासून दूर ठेवावे लागेल . आणि त्यासाठी गोवा फॉरवर्ड गोवा भर जनजागृती करत आहे . गोवा गोवेकारासाठी राखून ठेवूया .सेंटर क्लोज होवून येतात त्याना मांद्रेत संधी नाही , त्यासाठी जे कोणी ग्रासरूट वरून येतात त्याना संधी आहे आणि त्यासाठी दीपक कलंगुटकर सारख्याना आमदाराची संधी द्यावी असे आवाहन केले .

​​आमदार करण्यासा​ठी सर्वस्व अर्पण
आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितले मांद्रे मतदार संघातून गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार निवडून आणण्यासाठी कोणतेही दिव्य करण्याची पक्षाची तयारी आहे .

​​युती झाली तरी दीपकच उमेदवार
युती झाली तर मांद्रे मतदार संघ सोडणार का अश्या प्रश्नाला  उत्तर देताना जर युती झाली तरीही युतीचा उमेदवार म्हणून दीपक कलंगुटकरच असणार तिथ कोणतीही तडजोड केली जाणार नाही , दीपकच उमेदवार असेल असे पुनरुच्चार विजय सरदेसाई यांनी केला. कॉंग्रेस बरोबर युती झाली तर तर आम्ही  ठराविक जागा मागत आहोत जिथ आमचे उमेदवार ​विजयी  ​होईल तिथच फार मारतो  सगळीकडे नाही ,असाही टोला मारला .

विधानसभेत आवाज केला
आपण विधानसभेत आवाज केला फातोर्डा मतदार संघातला एकही प्रश्न आपण मांडला नाही , कारण तिथ व्यवस्थित आहे , त्यामुळे इतर मतदार  संघातील प्रश्न आपण घेतले , मात्र मान्द्रेच्या आमदराने आपल्या मतदार संघाचा एकतरी प्रश्न मांडला का असा प्रश्न उपस्थित केला.

भाजपाकडून सुटका एकवटची गरज
भाजपा सरकारने गोवा विकायला काढला आहे , मांद्रे मतदार संघ विकला गेला तो आता सुरक्षित ठेवण्यासाठी दीपक कलंगुटकर याना आमदार करायचे आहे , त्यासाठी भाजपातून सुटका मिळवण्यासाठी आता आम्ही एकवट करुया असे आवाहन केले .

2022 ची निवडणूक 2021 मधेही होवू शकते ?
विजय सरदेसाई यांनी बोलताना २०२२ ची निवडणूक २१ सालीही होवू शकते असा दावा केला .आम्ही निवडणुकीची घाई करण्यामागचे कारण नाही तर भाजपवाले गोवा सावंतवाडीत विकणार असा दावा केला .

मोपा गेम्ब्लिंग झोनची गरज नाही ?
तुम्ही सत्येत आलात तर मोपा गेम्बलिंग झोन विषयी  काय भूमिका असेल अश्या  प्रश्नाला उत्तर देताना मोपा हा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे तिथ गेम्बलिंग झोनची गरज नाही . आज जो पणजीचा मॉडेल आहे तो हलवला तर पणजीचेही लोक झोपणार ,अनेक राज्य आतुरलेली आहे कि  गेमिंग  झोन केसिनो इतरत्र  न्यायला , त्यासाठी कायदे केलेले आहेत , जमनीवर केसिनो आणण्यासाठी , आणि आता मांडवीचे केसिनो हलवले तर त्याचा आर्थिक व्यवस्थेवर परिणाम होणार  . कोरोना काळात खूप त्रास झाला ,

​दरम्यान, राज्य चालवण्यासाठी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे ३०० कोटी कर्ज घे​तात, ​ त्यातली २५० कोटी रुपये हे पगारावर खर्च केले जातात​.  म्हणून ते विधान सभेचे अधिवेशन तीन दिवसांनी संपवतात असा दावा केला .

​​मांद्रेचे उमेदवार दीपक कलंगुटकर यांनी बोलताना ज्यावेळी आपण पक्षात गेलो , त्यावेळेपासून कामाला सुरुवात केली आहे . पक्षाला, मतदारसंघातून वाढता पाठींबा मिळत आहे , आज प्रचाराचा श्रीफळ ठेवला ., भगवती देवीचा आशीर्वाद घेतला आहे . आजच्या दिवशी मतदार संघातील प्रमुख कार्यकर्त्यांची भेट घेवून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जातील ,शिवाय टेक्सी व्यवसाय , मांद्रे येथील होवू घालेल्या मनोरंजन सिटीवर नागरिकासोबत चर्चा करण्यात येणार असल्याचे दीपक कलंगुटकर यांनी सांगितले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: