गोवा 

पत्रकार लक्ष्मण दाजी ओटवणेकर यांचे निधन

पेडणे (प्रतिनिधी) :

हरमल येथील पत्रकार लक्ष्मण दाजी ओटवणेकर (53) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने काल 2 रोजी पहाटे निधन झाले.कालच दुपारी 12 वाजता खालचावाडा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या पश्चात पत्नी-लक्षिता(विषया),पुत्र सोहम,कन्या-लक्षाली,भाऊ,काका,काकी,चुलत बंधू,भावजया,पुतणे, पुतणी असा परिवार आहे.ते चांगल्यापैकी नाट्यकलाकार म्हणून परिचित होते.पेडणे तालुक्यात त्यानी अनेक गांवात हौशी रंगभूमीवर भूमिका करून चमक दाखविली होती.

हरमल नवरात्रोत्सव मंडळ, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, दूर्वांकर कला केंद्र,मराठी संस्कार केंद्र, श्री नारायणदेव हौशी नाट्यमंडळ तसेच गांवातील व तालुक्यातील अनेक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता.पत्रकारितेत त्यांनी असंख्य समस्यांना न्याय मिळवून देण्याचा सदोदित प्रयत्न केला तसेच कित्येकांना मदतीचा हातसुद्धा दिला.त्यांच्या अष्टपैलू स्वभावामुळे तालुक्यातील अनेक संस्थांकडून त्यांचा सत्कार तसेच अनेक मान-सन्मानाने गौरविण्यात आले होते.
माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी केंद्रीयमंत्री ऍड रमाकांत खलप,माजी मंत्री संगीता परब,शिवसेना राज्यप्रमुख जितेश कामत,गोवा फॉरवर्डचे दीपक कलांगुटकर, माजी जीपं सदस्य अरुण बांधकर,श्रीधर मांजरेकर, उद्योजक सचिन परब,नारायण रेडकर,नामदेव तुळस्कर,मांद्रेचे पंच राघोबा गावडे,बाबूसो हडफडकर, पंच प्रवीण वायंगणकर तसेच  तालुक्यातील पत्रकार, विविध पंचायतीचे सरपंच,उपसरपंच, सदस्य तसेच सामाजिक, सांस्कृतिक संघाचे सहकारी सदस्य व प्रतिष्ठित नागरिकांनी अंत्यदर्शन घेतले. त्यांच्या निधनामुळे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: