सातारा 

‘जावलीच्या मदतीला महाविकास सरकार कर्तव्यबध्द’

जावली ​(प्रतिनिधी) :
सातारा जिल्ह्यातील झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील वाई, पाटण, महाबळेश्वर तालुक्यांना ​मोठा फटका ​बसला आहे. ​हा सगळा भाग भौगोलिकदृष्ट्या दुर्गम असल्याने अतिवृष्टीमुळे​ या तीन तालुक्यामध्ये ​भूस्खलनाने मोठी जीवीत व आर्थीक ​हानी झाली आहे. दरम्यान जिल्ह्यावरील ​या ​आसमा​​नी संकटात राज्याच्या महाविकास आघाडी सरकारकडून दुर्गम जावलीच्या मदतीला कटीबद्ध असल्याची ग्वाही सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी जावली येथील रेगडी येथे भेटी दरम्यान पत्रका​रांशी बोलताना दिला .

यावेळी रेंगडी येथे शेतकऱ्यांशी ​ते ​संवाद साधत​ होते. यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, सभापती जयश्री गिरी, तहसीलदार राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, विजयराव मोकाशी, कांताराम कासुर्डे,शिवराम सपकाळ, रविकांत सपकाळ, आतिष कदम, संकेत पाटील यांची उपस्थिती होती.​ ​यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले, रेंगडी येथील चार जण पुराच्या पाण्यात वाहून गेले ही दुर्दैवी घटना आहे.

​आपत्तीग्रस्तांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे राहणार आहे. सातारा जिल्ह्यातील नुकसानीची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगितली असून जिल्ह्याला जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळण्यासाठी पाठपुरावा करू​​ वाहून गेलेल्या शेतीची दुरुस्ती करू,अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना आधार देऊ अशी ग्वाही पालकमंत्री पाटील यांनी दिली. रेंगडी दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन मंत्री पाटील यांनी केले., परिसरातील रेंगडी, आंबेघर, डांगरेघर,पुनवडी, केडंबे,बाहुळे, वाळंजवाडी,तळोशी, भुतेघर, बों डार वाडी येथील नुकसानीत शेतीची व वाहून गेलेल्या पुलांची पाहणी मंत्री पाटील यांनी करून शेतकऱ्यांशी संवाद साधून ठोस मदत मिळवून देण्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.​​

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: