गोवा 

डी. पुरंदेश्वरी यांनी घेतले महालक्ष्मीचे दर्शन 

पणजी :

भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीस डी. पुरंदेश्वरी यांनी आजच्या राजकीय दौऱ्याला सुरवात करण्याआधी पणजीच्या श्री महालक्ष्मी देवीचे आशिर्वाद घेतले. यावेळी त्यांनी मंदिर संकुलातील इतर देवतांचेही दर्शन घेतले.

डी. पुरंदेश्वरी या कालपासून राज्याच्या दौऱ्यावर आहेत. काल रात्री त्यांनी थिवी मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आज सकाळी त्यांनी महालक्ष्मी देवीचे आशिर्वाद घेतले यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, संघटन सचिव सतीश धोंड, प्रदेश सरचिटणीस दामोदर नाईक, माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येंकर आदी उपस्थित होते.
यानंतर त्यांनी ताळगाव समाज केंद्र परिसरात वृक्षारोपण केले. यावेळी महसुलमंत्री जेनिफर मोन्सेरात यांनी त्यांचे स्वागत केले. प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यावेळी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: