गोवा 

…अखेर विधेयकाचे नाव बदलले

पणजी :
वादग्रस्त विधेयकातून भूमीपुत्र हा शब्द वगळून आता गोवा भूमी अधिकारिणी विधेयक असं नामकरण केलं जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. सरकार या विधेयकावर जनतेच्या सूचना मागवणार असल्याचं सांगतानाच दोन महिन्यांनंतर पुन्हा काही बदल करून हे विधेयक नव्याने विधानसभेत मांडण्याची तयारीही सरकारने दर्शवली आहे. हे विधेयक मुळ गोंयकारांना अनेक पिढ्यांपासून वास्तव्य करत असलेल्या घरांचे आणि त्यांच्या घरांच्या जमिनीची मालकी देण्यासाठीच तयार केली. स्थलांतरितांना मालकी देण्यासाठी हे विधेयक आणलं गेलेलं नाही, अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.

​महसूल खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तसेच कायदेतज्ज्ञांसोबत बैठकी घेतल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी रात्री 9.45 दरम्यान हे वक्तव्य केलं. राज्यभरात भूमीपुत्र अधिकारिणी विधेयकावरून गदारोळ माजल्यानंतर मुख्यमंत्र्यांना हे स्पष्टीकरण द्यावं लागलं.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: