क्रीडा-अर्थमत

”लोवीना’ची प्रेरणा अनेक मुली घेतील’

मुंबई (अभयकुमार देशमुख) :
टोकियो ऑलिंपिकमध्ये महिला बॉक्सिंग स्पर्धेचे कांस्यपदक जिंकणाऱ्या लोवीना बोर्गोहेन हिचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे.

तुर्कीच्या विश्वविजेत्या बुसेनाज सुरमेनेलीन हिच्याविरुद्ध लोवीना जिंकली नसली तरी तिने देशवासियाचे मन जिंकले आहे. टोकियो आलिंपिकमध्ये देशाला तिसरं पदक जिंकून देत तिने देशाचा गौरव, देशवासियांचा आनंद बहुगुणीत केला आहे. लव्हलिननं जिंकलेल्या कांस्यपदकाचं मोल सुवर्णपदकापेक्षा कमी नाही. मुष्ठीयुद्धाचा गौरवशाली इतिहासात असलेल्या भारतात लव्हलिनच्या यशापासून प्रेरणा घेऊन अनेक मुली पुढे येतील. देशाचा गौरव वाढवतील”, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोवीनाचे कौतुक केलं असून भविष्यातील उज्ज्वल यशासाठी तिला शुभेच्छा देल्या आहेत.

लोवीना बोर्गोहेनने ऑलिंपिक बॉक्सिंगच्या ६९ किलो वजनी गटातले ऑलिंपिकपदक आधीच निश्चित केले होते. उपान्त्यफेरीत विश्वविजेत्या बुसेनाज सुरमेनेलीनकडून पराभव पत्करावा लागला तरी, तिने कडवी झुंज दिली. तिच्या मेहनतीचा, यशाचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. लव्हलिनने जिंकलेले ऑलिंपिक पदक भारतीय बॉक्सिंगचा नवी ऊर्जा, प्रेरणा देईल. विजेंदरसिंगने २००८ मध्ये, मेरी कोम हिने २०१२ मध्ये जिंकलेल्या बॉक्सिंगच्या ऑलिंपिक पदकांनंतर देशासाठीचं तिसरे ऑलिंपिक पदक जिंकून लव्हलिनने इतिहास घडवला आहे. लव्हलिनच्या यशाचा महाराष्ट्राला, देशाला अभिमान असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हटले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: