गोवा 

मांद्रे भाजपाचा विजय सरदेसाईंवर पलटवार 

पेडणे (निवृत्ती शिरोडकर) :
गोवा फॉरवर्ड चे आमदार ज्यावेळी मंत्री असताना पूर्ण गोवा आणि जमिनी विकायला काढल्या होत्या , ज्यावेळी भाजपा सरकारात ते मंत्री होते त्यावेळी ते भाजपचे गुणगान गायचे आता मंत्रिपद गेल्यामुळे ते वैफल्ग्रस्त झाले आहे ,आमदार दयानंद सोपटे यांनी नव्हे तर विजय सरदेसाई यांनी गोवा विकायला काढला होता असा दावा मांद्रे भाजपा मंडळ अध्यक्ष मधु परब यांनी मांद्रे येथे भाजपा कार्यालयात ४ रोजी आयोजित केलेल्या पत्रकार परीशधेत  केला .

यावेळी किसान मोर्चा अध्यक्ष दत्ताराम ठाकूर , सदस्य मच्छिंद्र पेडणेकर , गोविंद आजगावकर , सुनील आसोलकर , महेश मांद्रेकर , रवींद्र गोवेकर आदी उपस्थित केले .

भाजपा मंडळ अध्यक्ष मधु परब यांनी बोलताना मंत्री असताना विजय सरदेसाई यांचे अनेक कारनामे विरोधी पक्षाच्या नेत्यांनी वारंवार काढले होते ,मंत्री  असताना सरकारचा पुरेपूर फायदा घेतला जमिनीची प्रकरणेही लोकाना माहित आहे , आणि आता त्यांच्याकडील सत्ता गेल्यानंतर काही लोकाना घेवून तो मांद्रे मतदार संघात येतो आणि आमदार दयानंद सोपटे यांच्यावर टीका करतो , गोवेकाराना विजय सरदेसाई विषयी सर्व काही माहित आहे , त्यांनी मान्द्रेत येवून हवेत गोळी बार मारू नये असा सल्ला  दिला .

रवींद्र पेडणेकरयांनी बोलताना मान्द्रेतील जनता सुजाण आहे , आमदार विजय सरदेसाई यांनी या भागात येवून जनतेची दिशाभूल करू नये , मान्द्रेत जो मनोरंजन प्रकल्प होत आहे , त्याविषयी आमदार दयानंद सोपटे यांनी स्थानिकाना विश्वासात घेवून प्रकल्पाचा आराखडा मांडलेला आहे . या प्रकल्पातून स्थानिकाना रोजगाराची संधी मिळेल असा दावा पेडणेकर यांनी केला . या प्रकल्पात फिल्म सिटी होणार , तारांकित हॉटेल ,सभाग्रह होणार आहे .

भाजपा किसान मोर्चा अध्यक्ष दत्ताराम ठाकून यांनी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत व स्थानिक आमदार दयानंद सोपटे याना जनतेची जाण आणि हित माहित आहे जे काही प्रकल्प आणतात ते प्रकल्प जनहितासाठी असणार आहे . अश्या प्रकल्पाचे आम्ही स्वागत करतो , या प्रल्कल्पात एक कला दालन असणार आणि कलाकारांना त्याचा लाभ मिळणार आहे , शिवाय फिल्म सिटी तून स्थानिक कलाकारांना अभिनयाची संधी मिळेल असा दावा केला .

टाऊन प्लानिंग कमिशन ?
मच्छिंद्र पेडणेकर यांनी दावा करताना विजय सरदेसाई हे मंत्री असताना टाऊन प्लानिंग चे त्यांनी टाऊन कमिशन केले . मध्ये कमिशन घेण्याची प्रथा चालू केले असे सांगितले व बाहेरून ज्या मासे वाहतूक गाड्या यायच्या त्या प्रत्येक वाहनाकडून ते पाच हजार रुपये वसूल कमिशन म्हणून करायचे असा आरोप केल्यावर पत्रकारांनी तुमच्याकडे पुरावे आहेत तर सादर करा , त्यावर ते थोडे गडबडले या विषई विडीवो व्हाईरल झाले , बातम्या प्रसिद्ध झाल्याचा दावा पेडणेकर यांनी केला .  पत्रकारांनी पेडणेकर याना विचारले कि तुम्ही विजय मंत्री असताना त्यांच्या विरोधात का बोलत नव्हते असा प्रश्न केला . त्याला ते दावा करतात आम्ही आवाज करत होतो असे

माजी मुख्यमंत्री लक्ष्मिकान्त पार्सेकर यांची विजय सरदेसाई यांनी भेट घेणे कितपत योग्य असा प्रश्न उपस्थित केला असता ,भाजपा मंडळ अध्यक्ष मधु परब यांनी उत्तर देताना ते एक राज्याचे मुख्यमंत्री होते , ते आता माजी मुख्यमंत्री आहेत , जर विजय सरदेसाई यांनी त्यांची भेट का घेतली , याविशई उत्तर देणे आपली पात्रता नाही असे त्यांनी सांगितले . पक्षाचा आदेश मान्य करून आम्ही काम करीत आहोत आम्ही आमच्या विचाराने पक्षाचे काम नव्हे तर वरिष्ठ पक्षाचे जसे काम सांगतात तसे आम्ही करतो असे ते म्हणाले . .

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: