गोवा 

‘इन्टरनेट वापरा शिक्षणासाठी’

पेडणे ​(प्रतिनिधी) :
कोरोना काळात  विद्यालयीन शिक्षणावर परिणाम झाला . शाळा कॉलेज  बंद आहे , या काळात ऑनलाईन पद्धतीने शिक्षण चालू आहे , गावात इन्टरनेट सेवा विस्कळीत असल्याने त्याची सोय व्हावी म्हणून हि सेवा सुरु केली आहे त्याचा विधार्थ्यां​​नी लाभ घ्यावा असे आवाहन मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांनी यांनी तुये येथे मोफत व्हायफाय इन्टरनेट सेवा कार्यरत केल्यानंतर ते बोलत होते .

तुये येथील पंचायत सभागृहात ४ रोजी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला सरपंच सुहास नाईक , माजी सरपंच प्राजक्ता कन्नाईक ,माजी सरपंच प्रदीप परब , जयराम नाईक ,रोटरी क्लबचे सागर गोवेकर पंच कविता तुयेकर , गोवा पर्यटन विकास महामंडळ संचालक सुदेश सावंत आदी उपस्थित होते .

आमदार दयानंद सोपटे यांनी बोलताना गावागावात इन्टरनेट सेवेचे जाळे विणण्यासाठी कंपनी मार्फत केबल टाकण्याचे काम सुरु होते , काहीजणांनी मधेच काम रोखल्याने या सेवेला विलंभ झाला आहे . काम रोखणाऱ्यानी विधार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करायला हवा होता, तो करताच काम अडवल्याने या सेवेला विलंभ झाल्याचा दावा केला .

सरपंच सुहास नाईक यांनी बोलताना या सेवेविषयी आम्ही आमदार सोपटे यांच्याकडे चर्चा केल्यानंतर त्यांनी हि सेवा लगेच उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले .

गोवा पर्यटन विकास महामंडळ संचालक सुदेश सावंत यांनी बोलताना अत्यावश्यक असेलेल्या सेवेच्या माध्यमातून विरोधकानी राजकारण करू नये असे आवाहन करून त्याकडे आमदार सोपटे यांनी दुर्लक्ष करून आपले अविरत कार्य सुरु करण्याचे आवाहन केले.

यावेळी सागर गोवेकर यांनी इंटरनेट सेवा ग्रामीण भागात कश्या पद्धतीने अडचण येते विषयी  माहिती दिली.

स्वागत सूत्रसंचालन उदय मांद्रेकर यांनी केले.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: