गोवा 

‘तुम्ही नागरिकांचा आवाज दाबू शकत नाही’

पणजी :
राज्यातील महिलांवरील वाढत्या गुन्ह्यांविरोधात नागरिकांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात आम आदमी पार्टी नागरिकांसोबत उभी आहे. पणजीत ४ ऑगस्ट रोजी तरुण आणि नागरिकांनी राज्यातील महिलांवरील गुन्ह्यांबद्दल आणि भाजपा सरकारच्या निष्क्रियतेबद्दल संताप व्यक्त करण्यासाठी एकत्र येत आंदोलन केले. मुख्यमंत्री सावंत यांच्याकडे त्यांचे पूर्वीचे आंदोलन बंद करण्यासाठी पुरेसा पोलिस बंदोबस्त आहे.  मात्र गोव्यातील महिला आणि मुलांचे संरक्षण करण्यासाठी मात्र बंदोबस्त नाही, असे आप यावेळी म्हणाले.

एका आठवड्यात ३ बलात्कारांची नोंद झाल्यानंतर आठवड्याभारानंतर महिलांना त्यांच्या सुरक्षिततेबद्दल आश्वासन देण्यासाठी ठोस कारवाई न केल्याने नागरिक संतापले आहेत. बलात्कार करणाऱ्यांचा निषेध करण्याऐवजी बलात्काराचा दोष पीडितांवर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर टाकला आणि मुख्यमंत्र्यांनी अद्याप त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागितली नाही, म्हणून मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर नागरिकांनी संताप व्यक्त केला.

गोवा आणि विशेषतः गोव्यातील महिलांच्याबाबतीत सरकार अपयशी ठरले आहे. मुख्यमंत्र्यांकडे गृहखाते आहे. अनेकांनी यावेळी विचारले, की महिलांसाठी गोवा सुरक्षित ठेवण्यासाठी नवीन उपाय कुठे आहेत? मुख्यमंत्री सावंत गोव्यातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी एकमेव उपाय म्हणजे स्त्रियांना घरात राहण्यास सांगणे इतकेच करू शकतात का? गोवेकरांना हे जाणून घ्यायचे होते.

गोव्यातील महिला सुरक्षित राहतील याविषयी आश्वासन देण्याबाबत, अद्याप कोणतीही पावले उचलली गेली नाहीत, वेगवान तपास किंवा अधिक चांगली गस्त घालण्याबाबत चर्चा झालेली नाही.  “मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या वक्तव्यांसाठी माफी मागितलेली नाही, तसेच त्यांनी गोव्याला अधिक सुरक्षित कसे बनवावे याविषयीची पावलेही उचललेली नाहीत,” असे आम आदमी पक्षाचे गोवा संयोजक राहुल म्हांबरे म्हणाले.

मला गोवेकरांना आठवण करून द्यायची आहे की, राज्य महिला आयोग सुद्धा निष्क्रिय आहे. एक असे मुख्यमंत्री ज्याना यामध्ये किमान स्वारस्य देखील नाही, ते या प्रकरणात न्याय कसा देऊ शकतात ” असे ते म्हणाले.

‘मुख्यमंत्री  बलात्काराच्या बळींना दोषी ठरवणारे असंवेदनशील विधान कसे करू शकतात, तेही मुले आणि त्यांचे कुटुंबीय यांच्याबद्दल? “असा प्रश्न प्रतिमा कुतीन्हो, आप गोवा च्या उपाध्यक्ष यांनी विचारले. गोव्यात महिलांना सुरक्षित वाटण्यासाठी त्यांनी काहीच का सांगितले नाही? ” असेही त्या पुढे म्हणाल्या.

आम आदमी पक्षाचे प्रवक्ते वाल्मिकी नाईक म्हणाले, की “हे चिंताजनक आहे, की मुख्यमंत्र्यांनी बलात्कार रोखण्यासाठी आणि महिलांच्या संरक्षणापेक्षा हा विरोध दडपण्यात जास्त वेळ घालवला आहे. “जर आंदोलकांना दडपण्यासाठी पोलीस दल पसरू शकत असेल तर ते रस्त्यावर गस्त का घालत नाहीत?” असे नाईक पुढे म्हणाले.

“मुख्यमंत्र्यांची विधाने महिलांना हानी पोहचवण्याशिवाय आणखी काही करणार नाहीत” असे आपच्या नेत्या सेसिल रॉड्रिग्स म्हणाल्या. “हे धक्कादायक आहे की २१ व्या शतकात महिलांना सुरक्षिततेचे आश्वासन देण्याऐवजी, त्यांनी घरातच राहावे असे मुख्यमंत्र्यांना वाटते” असेही  रॉड्रीग्स पुढे म्हणाल्या.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: