सातारा 

‘आता तरी जावळीतल्या दगड खाणी बंद करणार की नाही?’

सातारा (महेश पवार) :

संपूर्ण सह्याद्री घाट विशेष करून जावळी तालुका हा अत्यंत मुसळधार पावसामुळे भयभीत आहे. गेली अनेक वर्षे वृक्षतोड डोंगर पोखरणे माती उचलून तस्करी करणे तसेच वाळू चोरी याच्याबद्दल सतत जावळी तालुक्यात प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. सध्या झालेल्या अतिवृष्टीने या भागात मोठ्या प्रमाणात दरड कोसळू लागल्याने आता तरी भविष्यातील नुकसान टाळण्यासाठी प्रशासन कार्यवाही करेल का? असा प्रश्न विचारत सातारा जवळीतील नेते दीपक पवार यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना याठिकाणच्या दगड खाणीविरोधात निवेदन दिले.

दीपक पवार यांनी दिलेल्या निवेदनानुसार, अलीकडे काही वर्षात जावळी तालुक्यात लोक प्रतिनिधी/  ठेकेदार/ अधिकारी यांच्या संगनमताने फार मोठा भ्रष्टाचार हैदोस व सदोष मनुष्यवधाचा कारभार सुरू आहे जावळी तालुका हा निसर्गसंपन्न असल्यामुळे राज्य सरकारने इको सेन्सिटिव्ह झोन म्हणजेच हरित पट्टा म्हणून घोषित केला आहे. पण येथे भागवार फार मोठे स्टोन क्रशर व त्यावरील प्रक्रिया करणारे प्रकल्प उभे आहेत. त्यासाठी लागणारा कच्चा माल हे डोंगर फोडून तासून सुरुंग लावून उध्वस्त करणे आणि डबर गोळा करणे. दररोज दगड काढण्यासाठी सुरुंग लावून डोंगर फोडणे. डोंगराचे यंत्राच्या साह्याने लचके तोडणे हे राजरोसपणे चालू आहे. या भागातील डोंगराची उंची कमी होत आहे व रस्ते उखडले तरी कोणीही अवाक्षर काढत नाही. मग लोकप्रतिनिधी असो अथवा अधिकारी परिसरातील सर्व ग्रामपंचायतीचे ठरवून देऊन सुद्धा दुर्लक्ष आहे. रोजच्या सुरुंगामुळे सर्व डोंगर भुसभुशीत होत आहेत डोंगराशेजारी असणारी गावे भयभीत जीवन जगत आहे. अशावेळी जिल्हाधिकारी यांनी तत्काळ बेकायदेशीर दगड खाणी व पवनचक्क्या बंद करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

दीपक पवार यांनी यावेळी कास बामनोली परिसरात धनदांडगे यांचे कड्यावरती उभी केलेली हॉटेल बंगले फार्म हाऊस इमले हे कोणाच्या परवानगीने आहेत? असा प्रश्न विचारला आहे.

संपूर्ण जावळी तालुका हा डोंगरी भाग आहे पण आता आमचे लोक हे डोंगर फोडून विकायचा धंदा करीत आहेत जरा तालुक्यातील गावांचा विचार करा. माळीण वा तळिये यासारख्या घटना स्टोन क्रेशर मुळे घडण्याची शक्यता आहे. जर लवकरात लवकर खाणी बंद केल्या नाही तर तालुक्यातील जनता बरोबर घेऊन कलेक्टर ऑफिस जवळ उपोषण करणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: