गोवा 

मुख्यमंत्र्यांविरोधात शिवसेनेचे पेडणेत धरणे

पेडणे (निवृत्ती शिरोडकर) :
कोलवा भागात घडलेल्या बलात्कार प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी विधान करून गोमंतकीयांचा अवमान केला त्याबद्दल गोमंतकीयांची जाहीर माफी मागावी यासाठी शिवसेनेतर्फे पेडणे टेक्सी स्टेन्ड येथे धरणे आंदोलन आयोजित करून घटनेचा  निषेध केला , शिवाय मुख्यमंत्र्यांनी जाहीर माफी मागितली नाही तर गोवाभर हे आंदोलन पेटवले जाणार असा इशारा शिवसेना राज्यप्रमुख जितेश कामत यांनी दिला.
राज्यात कयदा सुव्यवस्था बिघडल्याने आणि गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे अपयशी ठरल्याने त्याना त्या पदावर राहण्याचा अधिकार उरला नाही . त्यांनी राजीनामा देवून गोवा सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी आली.

यावेळी राज्यप्रमुख जितेश कामत, उपप्रमुख सुभाष केरकर, पेडणे तालुका प्रमुख बाबली नाईक, राजाराम पाटील, सुधाकर माने, विलास मलिक, व्हील्संस परेरा , मनोज सावंत , कृष्णा गावकर ,समीर परवार , सुशांत पार्सेकर दिवाकर जाधव प्रभाकर राऊळ आदी शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी राज्य प्रमुख जितेश कामत यांनी बोलताना पालकांनी पाल्यांची जबादारी घ्यावी असे विधान मुख्यमंत्री सावंत यांनी केले. ते विधान जर एखाद्या शाळा कॉलेजच्या कार्यक्रमात केले असते तर ते सर्वसाधारण मानले असते. परंतु जी घटना घडली, त्याचा संदर्भ घेवून जे विधान केले ते अशोभनीय आहे.  विधान चुकीचे असल्याने मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी , त्यांनी माफी न मागताच परत विधानसभेत विधान करताना सांगितले. पालकानी पाल्यांची थोडी जबादारी घ्यायला हवी ते बाहेर जातात. संस्कृती हि मुलांनी घडवावे ,असे ते सांगतात . पिडीत मुली जर आपल्या भावंडा सोबत गेले तर त्या सुरक्षित आहेत असे आई वडिलाना वाटते परतू  गुंडा त्या मुलांना मारून त्या अल्पवईन मुलीवर रेप करतात , त्यावेळी कायदा सुव्यवस्था बिघडल्याचे समोर येते ,त्याला पूर्णपणे भाजपा सरकार जबाबदार असल्याचा दावा जितेश कामत यांनी यावेळी केला .

उपप्रमुख सुभाष केरकर यांनी बोलताना कायदा सुवस्था बिघडली त्याला जबाबदार मुख्यमंत्री आहेत , नको असलेले विधान करून अवमान केला . दिल्ही येथे निर्भया प्रकरण घडले त्यावेळी सरकार बदलले ,आम्ही  राज्यात मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी अशी मागणी केली ,.वास्को येथे १४ जानेवारी २०१४ रोजी स्कूलमध्ये विधार्थिनीवर रेप होतो त्यावेळी भाजपा सरकार होते ते प्रकरण आजही सुटले नाही . भाजपच्या राज्यात अनेक प्रकाराने घडत आहे , त्याचा शोध लागत नाही .पेडणेत चंद्रकांत बांदेकर यांचा दिवसा ढवळ्या खून होतो त्याचाही उलगडा होत नाही , तरीही गृहमंत्री मौनव्रतात रमल्याचा  दावा केला .

सिंगापूरचा प्रतप्रधान जनतेची माफी मागतो
सुभाष केरकर यांनी बोलताना एकदा सिंगापूरला केवळ ४५ मिनिटासाठी वीज गेली होती , त्यावेळी प्रतप्रधान संपूर्ण जनतेची माफी मागतो तर चुकीच्या विधानामुळे मुख्यमंत्री सावंत गोमंतकीयांची माफी का मागत नाही असा सवाल उपस्थित केला .

पेडणे तालुका प्रमुख बाबली नाईक यांनी व्यक्तव्याचा निषेध  केला ,मुख्यमंत्री स्वत: काय बोलतात ते त्याना तरी कळते कि नाही असा प्रश्न उपस्थित केला.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: