गोवा 

पेडणे पालिका नव्या इमारतीतील ११ गाळे दुकानांना

पेडणे (निवृत्ती शिरोडकर )
आज पालिकेच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. पालिकेचे  उत्पन्न वाढविण्यासाठी घरपट्टी वाढविणे, पाणी तसेच वीज जोडण्या देण्यासाठी पालिकेने सर्वसामान्य नागरिकांना ञास न देता नागरिक कायद्या अंतर्गत नाहरकत दाखले देऊन  पालिकेचे उत्पन्न वाढविण्याच्य सूचना  नगरसेवकांनी ५ रोजी झालेल्या  बैठकीत केल्या.

पेडणे पालिकेची बैठक नगराध्यक्ष उषा नागवेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपनगराध्यक्ष मनोज हरमलकर, पालिका मुख्याधिकारी अक्षया आमोणकर,  नगरसेवक विष्णू साळगावकर, शिवराम तुकोजी, माधव शेणवी देसाई, सिद्धेश पेडणेकर, नगरसेविका आश्विनी पालयेकर, राखी कशालकर, तृप्ती सावळ देसाई व विशाखा गडेकर उपस्थित होते. यावेळी पेडणे पालिका बैठकीत विविध विषयावर चर्चा करुन विविध ठराव मंजूर करण्यात आले.

‘नवीन इमारत प्रकल्पात ११ दुकानदारांना गाळे’
पालिकेची इमारत मोडून याजागी नवीन पालिकेची इमारत प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष उषा नागवेकर यांनी मागच्या बैठकीत दिली होती, त्यावेळी तसा ठराव मांडले होते त्याला आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
या प्रकल्पाचा आरखडाबाबत सर्व नगरसेवकांना विश्वासात घेवून हा प्रकल्प उभारला जाणार आहे. या नवीन इमारत प्रकल्पात ११ जे पूर्वीचे दुकानदार आणि गाळे धारक आहेत त्या अकराही जणांना गाळे देणात येणाऱ्या गाळेधारकांची नावे बैठकीत वाचून दाखविली व त्यास मंजुरी देण्यात आली. याबाबत प्रत्येकाला किती जागा यावर चर्चा झाली. नगरसेवक माधव शेणवी देसाई यांनी ज्याप्रमाणे दुकानदाररांची जागा आहे त्याप्रमाणे त्यांचे पैसे घेतात त्या प्रमाणे त्यांना जागा द्यावी.व जे दुकानदार गेली अनेक वर्षे पुढच्या रांगेत आहेत त्यांना तशीच जागा पुढच्या रांगेत देण्याची सूचना माधव शेणवी देसाई यांनी केली.

दुकानदार व गाळेधारक यांना सध्या पालिकेचा कर कमी आहे तो नवीन गाळे दिल्यानंतर तो वाढवावा अशी सूचना विष्णू साळगावकर यांनी केली.

पालिकेचे कार्यालय होणार कदंबा बसस्थानकावर स्थलांतर
पेडणे पालिकेचे कार्यालय कंदबा बसस्थानकाच्या इमारतीत  स्थलांतर करावे लागणार असल्याची माहिती उषा नागवेकर यांनी दिली. पालिकेची इमारत मोडण्याअगोदर हे कार्यालय स्थलांतर करावे लागणार त्याबाबत पञव्यवहार झाला आहे. त्यासाठी कदंबा महामंडळाला प्रति महिना ३५ हजार रुपये भाडे भरावे लागणार असल्याची  माहिती नगराध्यक्षांनी बैठकीत दिली.

पालिकेची जैवविविधता समिती नव्याने स्थापन
यावेळी पालिकेची जैवविविधता समिती निवडण्यात आली. त्यात अध्यक्ष उषा नागवेकर,विशाखा गडेकर,राखी कशाळकर,तृप्ती सावळ देसाई,मनोहर पेडणेकर,सिद्धेश पेडणेकर,शाताराम कलंगुटकर,व सचिव म्हणून मुख्याधिकारी अक्षया आमोणकर यांची निवड केली.

पेडणे पालिका क्षेत्रातील सर्व प्रभागातील झाडे झुडपे रस्त्याच्या बाजूला आली असून त्याचा ञास नागरिक आणि वाहनचालकांना होत आहे. ही झाडे कापून घेण्यासाठी  जे कामगार लागणार त्यासाठी  पालिका संचालनालयाची मान्यता घेऊन हे काम लवकर पूर्णकरावी असा ठराव    नगरसेवक सिद्धेश पेडणेकर व विष्णू साळगावकर यांनी मांडला त्याला मंजुरी दिली.

सुलभ शौचालय नुतनीकरण
पेडणे पालिका क्षेत्रातील एकमेव असलेले सुलभ शौचालय यांचे नुतनीकरण करण्यासाठी सदर कंपनीचे पञ आल्याची माहिती नगराध्यक्ष उषा नागवेकर यांनी दिली. चर्चा करुन सुलभ शौचालय जर कंपनी नुतनीकरण करत असेल तर त्यांना मान्यता देण्यात यावी असे ठरले.

‘पालिकेच्या कार्यालयात सिटिजन चार्टर लावा’
सरकारी विविध  कार्यालयात तसेच इतर पालिकेत नागरिकांना हवे असलेले दस्तऐवज मिळविण्यासाठी अर्ज दिल्यानंतर कोणकोणते  दस्तऐवज  लागतात त्यांची माहीत कार्यालयात नागरिकांसाठी लावली जाते.माञ पेडणे पालिकेत अशी माहिती लावली नसल्याने पालिकेत याठिकाणी आपल्या कामासाठी येणाऱ्या नागरिकांना कोणती माहिती जोडावी हे कळता नाही.ते अर्ज देऊन जातात मग परता आठ दिवसाना येतात यात त्यांचा वेळ वाया जातो व नागरिकांना एखाद्या दस्दऐवज तसेच ना हरकत दाखल्यासाठी हेलपाटे मारावे लागतात ते त्यांना मारावे लागू नये तसेच नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी पालिका कार्यालयात सिटीजन चार्टर लावावा अशी मागणी नगरसेवक सिध्देश पेडणेकर यांनी केली.

यावेळी बैठकीत  विविध ठरवला मंजुरी दिली त्यात गाळेधारकांना दुकाने देणे , पालिका कामकाज बसस्थानकात हलवणे,विर्नोडा पंचायत क्षेत्रातील काचारा पेडणे कचरा प्रकल्पात घेण्यासाठी महिना २० वीस हजार रुपये घ्यावेत, एकूण दहाही प्रभागात विकास करण्याविषयी ठराव मांडण्यात आले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: