गोवा 

‘नारी शक्तीच्या हातात देश सुरक्षित’

पेडणे  (निवृत्ती शिरोडकर) :

देशाची नारी शक्ती हि देवीचे रूप आहे, देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी आपण याहीपुढे गावागावात फिरून तिथली, संस्कृती आणि संस्कार यांचा अभ्यास  करणार आहे, नारी शक्तीच्या हातात आपला देश सुरक्षित आहे, आगामी काळातही राज्यात आणि देशात भाजपचेच सरकार सत्तेवर येणार असे प्रतिपादन भाजपा महिला मोर्चा केंद्रीय नेत्या तथा सरचिटणीस सुखप्रीत कौर यांनी मांद्रे येथील भाजपा महिला मोर्चा सभेत केले.

मांद्रे भाजपा महिला मोर्चा यांनी मांद्रे जिल्हा पंचायत सभागृहात राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्ताने महिला सभा ७ आयोजित केली होती. यावेळी मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे,मांद्रे भाजपा मंडळ अध्यक्ष मधु परब,महिला मोर्चा अध्यक्ष दीपा तळकर,राज्य उपाध्यक्ष एकता चोडणकर,उत्तर गोवा उपाध्यक्षा नयनी शेटगावकर, दीपश्री सोपटे, आगरवाडा सरपंच प्रमोदिनी आगरवाडेकर,माजी सरपंच संगीता नाईक,केरी सरपंच सुरज तळकर,महिला सरचिटणीस शीतल नाईक,सपना मापारी, महिला नेत्या सावित्री कवळेकर आदी उपस्थित होते.

सूत्रसंचालन श्रुती केरकर यांनी तर समीक्षा शिरोडकर,नयनी शेटगावकर, संगीता लिंगुडकर, वंदना आजगावकर, रजनी शिरोडकर,प्राची मांद्रेकर, अनिशा केरकर  आदींनी पाहुण्याचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले . नयनी शेटगावकर यांनी प्रास्ताविक केले.

केंद्रीय नेत्या कौर यांनी पुढे बोलताना, एक कार्यकर्ता राज्याचा मुख्यमंत्री आणि देशाचा प्रतप्रधान बनतो हि ताकत भाजपाची आहे.देशात एकरा महिलाना मंत्रिमंडळात स्थान दिले त्याशिवाय महिला मोर्च्याचा कार्यकर्त्या माजी उपाध्यक्ष यांचा समावेश आहे. येणारी सरकार हि महिलाना समर्पित असणार आहे .महिलांच्या प्रगतीसाठी केंद्रसरकार प्रयत्न करत आहे .

१७ राज्यात भाजपचे सरकार आहे , त्यात महिला नेतृत्व पुढे येत आहे आणि हि किमया  केवळ भाजपा पक्षातच घडू शकते. स्वदेशी कपड्याना प्राधान्य देण्यासाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. त्यामुळे आजच्या दिनी अधिकाधिक महिलांनी हातमागच्या साड्या परिधान केलेल्या आहेत. त्या पारंपारिक व्यवसायाला प्राधान्य देण्यासाठी सरकार कार्यरत आहे. स्वदेशी कपड्यासाठी आता आम्हाला जागृत रहायला हवे असे कौर यांनी सांगितले.

आमदार दयानंद सोपटे यांनी पूर्ण भाषण हिंदीत करत असताना संघटनात्मक कामामुळे भाजपा मजबूत असल्याचे सांगितले. आमदार सोपटे यांनी बोलताना आपण चार वेळा निवडून आलो, एकदा जिल्हा पंचायत सदस्य व तीन वेळा आमदार झालो, आपण गरीब आहे आपण कडी महिलाना किंवा मतदाराना पैसे देवून सभना गर्दी करत नाही, जी महिला शक्ती आहे त्याना सरकारच्या विविध योजना मिळवून देतो, त्यामुळे महिला एकत्रित येतात असा दावा केला. आपण गरीब असलो तरीही आपले मन श्रीमंत आहे. आपल्या वाणीतून आपण लोकाना आकर्षित करतो असे सोपटे म्हणाले.

भाजपा महिला नेत्या सुलक्षणा सावंत यांनी बोलताना आजच्या दिनी एका कॉल वर अधिकाधिक महिला उपस्थित राहतात, हीच महिलांची ताकत आहे. आता या पुढे हातमाग कामगाराना काम मिळवण्यासाठी हातमागच्या कपडे वापरा असे आवाहन केले , स्थानिकांच्या व्यवसायाला प्राधान्य द्यायला हवे .

महिला मोर्च्या नेत्या शीतल नाईक यांनी बोलताना महिला शक्ती आमदारा सोबत आणि भाजपा सोबत असल्याने येणाऱ्या काळातही भाजपचे सरकार येणार असा विश्वास व्यक्त केला.

मांद्रे भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा दीपा तळकर यांनी बोलताना भाजपाची ताकत हि महिला शक्ती आहे, आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाचे आमदार म्हणून दयानंद सोपटे हेच निवडून येणार असे सांगितले .

एकता चोडणकर यांनी आभार मानले . यावेळी जेष्ठ महिलेचा सत्कार करण्यात आला . यावेळी मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: