सातारा 

शिवेंद्रराजेंनी दिला बळीराजाला मदतीचा हात 

मेढा (प्रतिनिधी) :

जावली तालुक्याला अतिवृष्टीच्या आसमानी संकटाने तालुक्यांतील शेतकर्यानवर संकटाचा डोंगर कोसळला आहे. अतिवृष्टीच्या तडाख्याने हवालादिल झालेल्या जावलीतील बळीराजाच्या शेतीची दैना झाली आहे . तर शेतातील विहीरी व मोटारीचे व तत्सम पाईपचे प्रचंड नुकसान नादगणे , वाहीटे , भुतेघर पश्चिम जावलीच्या गांवाना अतिवृष्टीचा जोरदार फटका बसला आहे . मात्र प्रशासकीय मदत येईपर्यत थांबतात ते आमदार शिवेंद्रराजे भोसले कसले . अतिवृष्टीने वेण्णा नदीला पुर आल्याने शेतीचे अतिशय नुकसान झालेल्या गांवाना स्वखर्चातुन आ शिवेंद्रराजे भोसले यांनी नादगणे व वाहीटे गावातील शेतकर्याना मोटर व संबधित सर्व साहीत्याची मदत नव्हे तर कर्तव्यपुर्रती केली आहे .

अतिवृष्टीच्या आसमानी संकटात जावलीतील शेतकरी पिचला असताना . प्रशासनाची मदत न पाहता आ शिवेंद्रराजे भोसले यांनी बळीराजाला केलेली मदत लाखमोलाची  आहे . शेतकर्साच्या सकटांत त्याला देवु केलेल्या मदतीने अतिवृष्टीने मोडकळीस आलेल्या शेतकर्याचा झालेली दुरावस्था व पिचलेली परीस्थीती दिवसे दिवस भयानक होत आहे . दुर्गम जावलीतील कडेकपारीत सर्वसामान्य शेतकर्याला आसमानी संकटात मिळालेला मदत लाखमोलांची आहे .

जावलीतील अतिवृष्टीच्या संकटानंतर शेतीचे भयानक नुकसान त्याचबरोबर शेतीच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तुचे नुकसान वाहीटे व नादगणे येथील नुकसान ग्रामस्थांनी आणि वाहिटे गावातील मुंबईस्थित लोकांनी आ. शिवेंद्रसिंहराजेंशी संपर्क साधून पाणीप्रश्न सोडवण्याची मागणी केली. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी तात्काळ स्वखर्चाने मोटार, पाईपलाईन, केबल, स्टार्टर आदी सर्व साहित्य उपलब्ध करून ग्रामस्थांकडे सुपूर्त केले आणि वाहिटे ग्रामस्थांवर आलेले संकट दूर केले. यावेळी ज्ञानदेव रांजणे यांच्यासह वाहिटे गावचे सरपंच राजाराम जांभळे, केळघरचे माजी सरपंच सुनिल जांभळे, अर्जुन जांभळे, दीपक जांभळे आदी उपस्थित होते. गावचा पाणीप्रश्न सोडवल्याबद्दल  वाहिटेच्या ग्रामस्थ व शिवेंद्रसिंहराजेंचे आभार मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: