गोवा 

पी चिदंबरम गोवा काँग्रेसचे निवडणुक निरीक्षक

पणजी : 
माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांची गोव्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेश काँग्रेसचे निरीक्षक म्हणून नियुक्ती कारण्यात आली आहे.
२०२२ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सत्तांतर घडवण्यासाठी काँग्रेस पक्ष कंबर कसून तयारी करत असून, कालच आम आदमी पक्षाचे माजी राज्य समन्वयक एल्विस गोम्स यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामुळे ‘आप’च्या फुग्याला टाचणी लागली आहे. दरम्यान राज्याचे काँग्रेस प्रभारी दिनेश गुंडू राव हे सातत्याने पक्षाला मार्गदर्शन करत असून, आता निवडणुकीचे वरिष्ठ निरीक्षक म्हणून देशाचे माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांची घोषणा पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी केली आहे.
दरम्यान, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर आणि विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी पी चिदंबरम यांच्या नियुक्तीचे स्वागत केले असून, ‘पी चिदंबरम यांच्या नियुक्तीमुळे गोवा काँग्रेसला उत्साह मिळाला असून, चिदंबरम यांच्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा पक्षाला मोठा फायदा होऊन, आगामी निवडणुकीमध्ये पक्षाला निर्विवाद यश मिळेल असा आशावाद दिगंबर कामात यांनी आपल्या ट्विटमध्ये व्यक्त केला आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: