गोवा 

पी चिदंबरम यांच्या नियुक्तीमुळे काँग्रेसमध्ये उत्साह

पणजी :
कॉंग्रेसचे जेष्ठ  नेते पी चिदंबरम यांची गोवा विधानसभा निवडणूकांसाठी निरीक्षक व रणनितीगार म्हणुन झालेल्या नेमणुकीचे गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीने स्वागत केले आहे. आगामी २०२२ च्या विधानसभा निवडणूका कॉंग्रेस पक्ष बहुमताने जिंकणार याचा विश्वास गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीला आहे.

गोव्याची अस्मिता सांभाळण्यासाठी कॉंग्रेस पक्ष सत्तेत येणे गरजेचे आहे ह्या गोमंतकीय जनतेच्या भावनांची दखल कॉंग्रेस पक्षाच्या हायकमांडने घेतल्याचे हे द्योतक आहे असे प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी म्हटले आहे.

कॉंग्रेसचे जेष्ठ नेते पी चिदंबरम यांची गोव्याचे निवडणूक रणनितीकार व निरीक्षक म्हणुन झालेली नेमणुकीने गोव्यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांना स्फुर्ती मिळाली असुन, त्यांच्या मार्गदर्शनाने व अनुभवाने कॉंग्रेस पक्ष गोव्यात आगामी विधानसभा निवडणूकांत सत्ता संपादन करणार आहे असे  कॉंग्रेस विधीमंडळ गट नेते दिगंबर कामत यांनी म्हटले आहे.

आम्ही आता लोकसंपर्क वाढवुन गोमंतकीयांचे हित जपण्याचे  कार्य करणार असुन, लोकांचा विश्वास संपादन करणार आहोत असे दिगंबर कामत म्हणाले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: