सातारा 

‘पुनर्वसन करा; नाही तर कोयनेत उड्या घेतो’

सातारा (महेश पवार) :

जिल्ह्यातील जावळी तालुक्यांचे शेवटच्या टोकावरील वेळे गावाचं पस्तीस वर्षे पूर्ण झाली तरी पुनर्वसन होत नाही , समोर कोयनेचे बॅकवॉटर आणि मांग कोयना अभयारण्य पस्तीस वर्षे झाली शासन पुनर्वसन करते , नुसती आश्वासनं दिली जातायत पण कोणी लक्ष देत नाही ,असं ग्रामस्थांनी ‘राष्ट्रमत’शी बोलताना सांगितले….

तर वेळे गावाच्या जमिनी आधी धरणात गेल्या , म्हणून धरणाच्या बाजूच्या जमीन दिल्या , अन् पुन्हा व्याघ्र प्रकल्पात  १९८५ मध्ये गावं गेली पण तेव्हापासून वनविभाचे पुनर्वसन होते यांची वाट पाहतायत.

नुकत्याच झालेल्या पावसामुळे कडा कोसळला आणि पडलेल्या कड्याच्या मलम्यात गेली , तर काही घर पडली सर्कल तलाठ्याने लांबून पंचनामे केले आणी गेले , जाताना सांगुन गेले कडा कोसळेल तुम्ही स्थलांतर करा , पण ना आमदार गेले ना खासदार गेले ना तहसीलदार प्रांत आले . आम्ही आम्हाला ही नाही राहायचे इथं, आमचं पुनर्वसन करा , अस मागणं घेऊन आज सर्व ग्रामस्थ वनविभागाच्या अधिकार्याकडे मांडण्यासाठी आलें असता आजही त्यांना पुन्हा आश्वासन मिळाल्याचे सांगताना येथील लोक भावुक होऊन बोलले की साहेब असं कड्याखाली , आणि जंगली प्राण्यांची शिकार होऊन मरण्यापेक्षा आम्ही कोयनेच्या पात्रात उडी घेऊन आत्महत्या करतो…

अतिवृष्टी झाल्यानं गावच्या वर असलेले डोंगर खचले तर पावसाच्या पाण्याने जमिनी वाहून गेल्या , घरं पडली, म्हणून वन आज वेळे येथील ग्रामस्थ उप वनसंरक्षक महादेव मोहिते यांना भेटायला आले होते. मात्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना दिवसभर ताटकळत बसवले व मिटिंगला निघुन गेले. त्यानंतर पार संध्याकाळी मीटिंगवरून  आल्यावर ते भेटले आणि जशी पस्तीस वर्षे आश्वासन मिळाली तसेच आज ही पुन्हा आश्वासन मिळाल्याने या गावांतील लोकांनी आता मुख्यमंत्र्यांना हाथ जोडून विनंती केली की तुम्ही लक्ष घाला नाहीतर आम्ही लेकराबाळा सोबत पंधरा ऑगस्ट ला कोयना जलाशयात आत्महत्या करतो.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: