गोवा 

​कुर्डीचे सरपंच डोमसीओ बरेटो ‘आप’मध्ये

पणजी:
कुर्डी पंचायतीचे सरपंच डोमासिओ बॅरेटो यांनी आज आम आदमी पार्टीमध्ये निमंत्रक राहुल म्हांबरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. बॅरेटो म्हणाले, की ते अरविंद केजरीवाल यांच्या प्रामाणिकपणामुळे प्रभावित झाले आहेत. आम आदमी पार्टी नेहमी लोक कार्याला महत्त्व  देते.

त्यांनी सांगितले की, भाजप सरकारने कुर्डी गावाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे आणि यामुळे रहिवासी त्रस्त आहेत. बॅरेटो म्हणाले की, आपचा प्रामाणिकपणाच गोव्याचे कल्याण करू शकतो.​ ​गोव्यातील बहुतांश गावांप्रमाणे कुर्डी गाव सार्वजनिक वाहतुकीपासून वंचित आहे. तरुणांना नोकरीची गरज आहे. शिवाय ऑनलाइन वर्गांसाठी पुरेशी इंटरनेट कनेक्टिव्हिटी नाही.

दरम्यान, आप ने आक्रमकपणे कुर्डी सारख्या गावांपर्यंत पोहचून त्यांना सेवा पुरवल्या आहेत. सरकारने ऑक्सिमीटर तपासणी मोहिमेपासून ते कोविड महामारीच्या काळात रेशन सुद्धा दिले नाही.

आपची ऑक्सिमित्र मोहीम गोवेकरांपर्यंत पोहोचली. ज्यांना कोरोना व्हायरसची चिंता होती, त्यांना मार्गदर्शन आवश्यक होते आणि ऑक्सिजनची पातळी तपासण्याची आवश्यकता होती.  आपच्या या​ ​प्रामाणिकपणामुळेच डोमासिओ बॅरेटो पार्टीकडे आकर्षित झाले. सरकारकडे भरपूर निधी आहे पण गोवेकरांना मदत करण्याची इच्छाशक्ती नाही,” डोमासिओ बॅरेटो म्हणाले.

“तरुणांना नोकऱ्या नाहीत, विद्यार्थ्यांकडे अभ्यासासाठी इंटरनेट नाही आणि आमच्या गावात मूलभूत प्रवासासाठी सार्वजनिक वाहतूक सुद्धा नाही. वस्तुस्थिती अशी आहे,  की भाजप सरकारकडे निधी असताना त्यांना गोवेकरांवर खर्च करायचा नाही.

दुसरीकडे अरविंद केजरीवाल यांनी प्रामाणिकपणाचे राजकारण प्रत्यक्षात आणले आहे. ते देशातील एकमेव नेते आहेत जे केवळ बजेटमध्येच नव्हे तर कमी बजेटने प्रकल्प पूर्ण करतात. गोव्यातील अनेक प्रकल्पांमध्ये भ्रष्टाचाराने खर्च वाढवला जातो आणि शेवटी त्याचा त्रास करदात्याला होतो, असे बॅरेटो म्हणाले. लॉकडाऊनमुळे गोवेकरांना त्रास होत आहे, परंतु भाजप सरकारने आम्हाला मदतही केलेली नाही.

दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील लोकांना जागतिक दर्जाची आरोग्य सेवा दिली आहे आणि लॉकडाऊन वेळी लहान व्यवसाय, रिक्षा मालक आणि टॅक्सीकरांना मदत केली आहे. आम्हाला गोव्यात हे मॉडेल हवे आहे, “बॅरेटो म्हणाले.​​

डोमासिओ बॅरेटो सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि सर्व गोवेकर त्यांच्याकडे आशेने पाहतात. त्यांना माहित आहे, की भाजप आणि काँग्रेसला गोव्याचे संरक्षण करण्यात रस नाही, असे आपचे गोवा निमंत्रक राहुल म्हांबरे म्हणाले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: