Homeसातारा 

‘महाबळेश्वर नगरपालिकेच्या ‘त्या’ दोन्ही सभा नियमबाह्य’

पाचगणी (विशेष प्रतिनिधी) :

महाबळेश्वर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष स्वप्नीली शिंदे याच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या मार्च व एप्रिल महिन्याच्या सभा नियमबाह्य असून या सभेमध्ये घेण्यात आलेले सर्व ठराव रद्द करण्याचा निर्णय पुणे विभागीय आयुक्त यांनी दिला आहे. यामुळे पालिकेच्या १२ नगरसेवकांनी केलेल्या नियमबाह्य कारभाराचा बुरखा फाडल्याने महाबळेश्वरमध्ये आयुक्त पुणे यांच्या निर्णयाने नगरपालीकेत खळबळ उडाली आहे.

महाबळेश्वर मुख्यअधिकारी पल्लवी पाटील यांनी जिल्हाप्रशासन अधिकारी याच्याकडे मार्च व एप्रिल महीन्यातील सर्वसाधारन सभा व तहकुब सभा यापुरेशा कोरम अभावी नियमबाह्य असल्याबाबतचे पत्र जिल्हाअधिकारी सातारा यांना पाठवले होते. तर महाबळेश्वर नगरपालीकेच्या ११ नगरसेवकांनी मार्च महिन्यात घेण्यात येणारी सभेचे विषय नगरपालीकेला आर्थीक तोटा व व्यक्तिगत फायद्याचे असल्याने ८४ ठराव रद्द करुन सभा रद्द करण्याकरीता जिल्हाअधिकारी सातारा याच्याकडे तक्रार केली होती .

जिल्हाअधिकारी सातारा यांनी केलेल्या सखोल चैाकशीनतंर जिल्हा प्रशासन अधिकारी अभिजीत बापट यांनी मुख्यअधिकारी महाबळेश्वर यांना मार्च व एप्रिल महीन्यात झालेल्या सभेच्या ठरावाची अमंलबजावनी तुर्त रद्द करण्यात यावी असे पत्र दिले होते . मात्र जिल्हाअधिकारी सातारा यांनी ३० दिवसात यांवर अतिंम निर्णय न घेतल्याने तसेच आयुक्तानी ४० दिवसात निर्णय न दिल्याने कुमार शिंदे व त्याचे सहकारी नगरसेवक यांनी मुबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती . मात्र न्यायालयाने सदर्व प्रकरणात आयुक्ताना ९ ॲागस्ट पर्यंत अतिंम निर्णय देण्याचा आदेश बजावला होता. पुणे आयुक्त सैारभ राव यांनी महाबळेश्वर नगरपालीकेची मार्च व एप्रिल महीन्यात घेण्यात आलेली सभा नियमबाह्य असल्याचा निर्णय दिला आहे .

महाबळेश्वर नगरपालीकेत गत काही दिल्लीपासून नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे व नगरसेवक कुमार शिंदे याच्या हम करसो भुमीकेविरेधात उपनगराध्यक्ष अफजल सुतार याच्यासह ११ नगरसेवकांनी पुकारलेल्या बंडाला आयुक्ताच्या निर्णयाने बळकटी आली आहे . नगरपालीकेचे आर्थीक नुकसान व तोटा करुन स्वार्थ भुमीका घेणार्सा नगराध्यक्ष स्वप्नाली शिंदे व कुमार शिंदे यांना आयुक्ताच्या निर्णयाने चपराक बसली आहे . महाळेश्वर नगरपालीकेचे राजकारण गत काही दिवसांपूर्वी उपनराध्यक्ष अफजल सुतार , नगरसेवक प्रकाश पाटील , नगरसेवक किसनशेठ शिंदे यांच्यासारखे जुन्या व जाणत्या नगरसेवकांनी एकाधिकारशाही विरोधात आकरा नगरसेवकांची मोट बाधली असल्याने . ११ नगरसेवकांची भुमीका शहराच्या विकास व आर्थीक धोरणाला योग्य सांगणारा महत्वपुर्ण निर्णय आयुक्तांनी सभा रद्द करुन दिला असल्याचे लपून राहिले नाही.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: