गोवा 

‘…म्हणून शेत जमिनी टिकवून ठेवण्याची गरज’

​पेडणे (निवृत्ती शिरोडकर ) :
शेतीजमीन टिकवून ठेवण्याची गरज असून, शेती जमिनी टिकवून ठेवून निसर्ग सौंदर्याने नटलेल्या गोवा प्रदेशाचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी भविष्याचा विचार करून योग्य नियोजन करण्याची जबाबदारी शहर आणि नगर नियोजन खात्याची आहे. अधिकारी प्रामाणिकपणे हे काम करतील असा विश्वास आहे. हे खाते लोकांच्या अपेक्षा वाढवते. काही चुकत असल्यास दाखवून द्यावे. जेणेकरून चूकीची सुधारणा करणे शक्य आहे. असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री चंद्रकांत उर्फ बाबु कवळेकर यांनी आज पेडणे येथे केले.

पेडणे येथे खासगी जागेत असलेले शहर आणि नगर नियोजन खात्याचे विभागिय कार्यालय पेडणे येथील कदंब महामंडळाच्या बस स्थानकावर स्वतंत्र जागेत स्थलांतर केले आहे. कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी स्थानिक आमदार उपमुख्यमंत्री मनोहर उर्फ बाबु आजगावकर, मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे, पेडणे नगर पालिकेच्या नगराध्यक्ष उषा नागवेकर, जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कशाळकर, मनोहर धारगळकर व खात्याचे वरिष्ठ अधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

पुढे बोलताना कृषीमंत्री या नात्याने उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर म्हणाले शेतकऱ्यांच्या जमिनी पडीक आहेत. शेती करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे. अशा लोकांना यंत्रे खरेदीसाठी राज्य सरकारने सबसिडी मध्ये भरमसाठ वाढ केली आहे. याचा लाभ सर्वांनी घेऊन गोवि राज्यात हरीत क्रांती चडवावी. सरकार शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत देण्यासाठी तत्पर आहे.

सुरूवातीला उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री बाबु आजगावकर आणि मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांच्या उपस्थितीत नामफलकाचे अनावरण केले. त्यानंतर फित कापून आणि पारंपरिक समई प्रज्वलित करून कार्यालयाचे रितसर उद्घाटन करण्यात आले.

त्यानंतर झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे म्हणाले राज्याचे अस्तित्व टिकवून ठेवणे ही शहर आणि नगर नियोजन खात्याची फार मोठी जबाबदारी आहे. या खात्याचे अधिकारी हि जबाबदारी विसरले आहेत. पर्यटक म्हणून गोव्यात येणाऱ्या लोकांना समुद्र किनारी पार्किंगसाठी जागा ठेवली नाही. काही गावात स्मशानभूमी देखील राखून ठेवली नाही. परप्रांतीयांना परवाना देताना ज्या जागेत स्मशानभूमी सारखी महत्त्वाची ठिकाणे आहेत. त्या जागेवर या खात्याने मान्यता देऊ नये.

स्थानिक आमदार उपमुख्यमंत्री बाबु आजगावकर यावेळी बोलताना म्हणाले शहर आणि नगर नियोजन म्हणजे पिडीए लोकांसाठी पीडा आहे असे वाटते. पेडणे मतदारसंघात मोठे प्रकल्प होऊ घातले आहेत. त्यामुळे बेरोजगारांना रोजगार उपलब्ध. होणार आहे. तसेच हा मतदारसंघ सर्व सोईनीयुक्त असा एक नंबरचा मतदार संघ बनणार आहे. पेडणे मतदारसंघात होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय मोपा विमानतळामुळे शहरीकरण होणार आहे. अशावेळी नियोजन महत्त्वाचे आहे.  मतदार संघातील प्रकल्पांमुळे बेकारीचा प्रश्न याच मतदारसंघातून सुटणार आहे. पुढील एका महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा मैदानाची पायाभरणी केली जाईल. अधिकार्यांनी लोकांसाठी कामात सुटसुटीतपणा आणावा. असे शेवटी बाबु आजगावकर म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय भंडारी यांनी केले.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: