गोवा 

चर्चिलच्या बालेकिल्ल्यात ‘आप’चा शिरकाव 

​बाणावली :

कधीकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे चर्चिल आलेमाव यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या बाणावलीमध्ये आम आदमी पक्षाने सोमवारी नवीन कार्यालय उघडले आहे.  यामुळे​ ​त्यांनी सासष्टीसह बाणावलीमध्येही आपली पकड मजबूत केली आहे.

पक्षाचे बाणावलीमधील पहिले जिल्हा पंचायत सदस्य हॅन्झेल फर्नांडिस आणि कॅप्टन वेंझी व्हीएगास यांच्या नेतृत्वाखाली पक्ष अधिकाधिक आक्रमक बनला आहे. या भागातील लोकांना पक्षाशी अधिक चांगल्या प्रकारे जोडण्यासाठी येथे कार्यालय स्थापन करण्यात आले आहे. रहिवाशांना विविध समस्यांवर मदत करण्यासाठी आप गोव्याची बाणावली टीम कॅप्टन वेंझी विएगास यांच्या नेतृत्वाखाली आक्रमकपणे काम करत आहे.

​​

अलीकडेच आपचे जिल्हा पंचायत सदस्य हँझेल फर्नांडिस यांनी मलेरिया आणि डेंग्यूसारख्या गंभीर रोगांशी लढण्यात मदत करण्यासाठी प्रत्येक पंचायतीला त्यांच्या फॉगिंग मशीनचे वाटप करण्यात आले. कॅप्टन व्हिएगास यांनी संपूर्ण बाणावलीमध्ये आक्रमक फॉगिंग मोहीम राबवल्यानंतर, प्रमुख सार्वजनिक ठिकाणी फॉगिंग केले.

आप ची बाणावली टीम सीझेडएमपी चळवळी दरम्यान रहिवाशांसोबत ठामपणे राहिली होती. याशिवाय त्यांनी घरोघरी जाऊन रहिवाशांना रेशन पुरवले आहे, आणि अगदी बाणावली मधील समुद्री खलाशांच्या समस्याही सोडवल्या आहेत.

काँग्रेसच्या छावणीत प्रचंड गोंधळाच्या पार्श्वभूमीवर आपने कार्यालय उघडणे महत्त्वाचे ठरते कारण वेळळीमधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी बंड केले आणि विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांना गावतामधील साप म्हणून संबोधले. त्यानंतर काँग्रेसचे आमदार अलेक्सिओ रेजिनाल्डो लॉरेन्स यांनी खुलासा केला की, काँग्रेसचे उर्वरित आमदार गोव्याच्या प्रश्नांसाठी लढण्याऐवजी त्यांच्या चेंबरमध्ये झोपतात.

काँग्रेस चे प्रवक्ते ट्रोजन डीमेलो यांनी लोकांना फोनवर कथितपणे सांगितले की गिरीश चोडणकर हे तिकीट वाटपात भाजपसोबत हात मिळवतात.

उदघाटनावेळी आपचे जिल्हा पंचायत सदस्य हँझेल फर्नांडिस म्हणाले की “आज बाणावली रहिवाशांना वाटते की आपने सिद्ध केले की ते एक चांगला पर्याय ठरू शकतात. आमचे नवीन कार्यालय पक्षकार्य आणि विस्तार वाढवण्यासाठी एक केंद्र म्हणून काम करेल”

आम आदमी पक्षाचे नेते कॅप्टन वेंझी व्हेएगास म्हणाले की, “बाणावली हे आपच्या राजकीय इतिहासातील एक महत्वाचे ऐतिहासिक ठिकाण आहे. येथील रहिवासी असे मतदार आहेत ज्यांनी गोव्यामध्ये लोककेंद्रित शासन आणण्याच्या ‘आप’च्या प्रवासातील पहिली पायरी बनण्यास मदत केली आहे. गोव्यात बदल घडवून आणण्यासाठी ही पुढची पायरी असेल, ज्या बदलाची सर्व गोवेकर वाट पाहत आहेत. आप हा भारतातील एकमेव पक्ष आहे जो आपल्या आश्वासनांची पूर्तता करतो आणि गोवेकारांसाठी आपच पात्र पक्ष आहे. मी प्रत्येकाला आपला पाठिंबा देण्याची विनंती करतो.  गोव्यात बदल घडवून आणण्यास आम्हाला मदत करा.

आम आदमी पक्षाचे गोवा निमंत्रक राहुल म्हांबरे म्हणाले, की ” आम आदमी पक्षासाठी बाणावली हे नेहमीच एक खास ठिकाण आहे कारण आमचा पहिला विजय येथेच झाला होता. बाणावलीच्या रहिवाशांना हे समजले आहे की काँग्रेस आणि चर्चिल अलेमाव हे भाजपचेच बाहुले आहेत .त्यांना समजले आहे की फक्त आपच गोव्यात बदल घडवून आणू शकते. अनेक वर्षांपासून सत्तेत असलेले त्यांचे आमदार रहिवाशांसाठी एकही दवाखाना का बनवू शकले नाहीत हे गोवेकारांना जाणून घ्यायचे आहे. बाणावलीकरांना विकासाचे राजकारण हवे आहे. “​
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: