गोवा 

‘नगर नियोजन कायद्याचे कलम १६-ब काँग्रेस करणार रद्द’

पणजी :
गोव्यात २०२२ च्या विधानसभा निवडणूकांत कॉंग्रेस पक्ष स्पष्ट बहुमताने सत्ता स्थापन करणार असुन, आमचे सरकार नगर नियोजन कायद्याचे कलम १६-ब व सदर कलमाखाली रुपांतरीत केलेली सर्व जमीन रद्द करणार आहे तसेच गोवा घटक राज्य दिन म्हणजे ३० मे २०२२ पूर्वी गोव्यात मत्स्य चाचणी प्रयोगशाळा स्थापन करणार आहे अशी घोषणा कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे. गोव्याचे पर्यावरण नष्ट करणारे तिन प्रकल्प रद्द करणार असल्याचे यापूर्वीच आमचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी १८ जून २०२२ रोजी ऐतिहासीक लोहीया मैदानावरुन जाहीर केले आहे  असे त्यांनी पूढे सांगितले.

कॉंग्रेस पक्ष सत्तेत आल्यानंतर नगर नियोजन कायद्याचे कलम १६-ब रद्द करुन सदर कलमाखाली रुपांतरीत केलेली सर्व जमिन परत मूळ दर्जावरच आणणार आहे. भाजप सरकारच्या “सुटकेस टू सुटकेस” धोरणाखाली लोकांनी कलम १६-ब खाली आपली जमिन रुपांतरीत करु नये असा इशारा यापुर्वीच आम्ही दिला होता असे गिरीश चोडणकर म्हणाले.

गोव्याची अस्मिता राखणे हे कॉंग्रेस पक्षाचे कर्तव्य असुन लोक भावनांचा आदर करुन जनतेचा विश्वास आम्ही संपादन करणार आहोत. निसर्गाचे वरदान लाभलेल्या या भूमिचे रक्षण करणे आमची जबाबदारी आहे.

मासे हा गोमंतकीयांचा आहार असुन, लोकांचे आरोग्य जपणारे मासे त्यांना उपलब्ध करुन देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. गोवा घटक राज्य दिन,  ३० मे २०२२ पुर्वी आम्ही गोव्यात मत्स्य चाचणी केंद्राची उभारणी करणार असुन गोमंतकीयांना फोर्मालीन नसलेले मासे उपलब्ध करुन देणार आहोत असे गिरीश चोडणकर म्हणाले.

गोव्याचे भ्रष्ट माजी मुख्मंत्री व खोटारडेपणाचे बादशहा स्व. मनोहर पर्रिकर यांनी जमीन रुपांतरणाला मोकळीक देवून गोव्याचा नाश केला. केवळ आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी त्यांनी आपल्या राजकीय मित्रांच्या सल्ल्याने “मत्स्य माफीयांना” संरक्षण दिले व गोमंतकीयांच्या जीवाशी खेळ मांडला असा आरोप गिरीश चोडणकर यांनी केला.

आज गोव्याचे भ्रष्ट मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत स्व. मनोहर पर्रिकरांचाच वारसा पूढे नेत असुन, ते नगर नियोजन कायद्याच्या कलम १६-ब कलमाखालील जमिन रुपांतरणाला व “फोर्मालीन माफीयाला” प्रोत्साहन देत आहेत. चार वर्षामागे गोव्यात मत्स्य चाचणी केंद्र स्थापन करणार असल्याची घोषणा करुनही सरकारने आजपर्यंत काहीच केलेले नाही.

लोकांची मागणी असतानाही, सरकारने कर्तव्यदक्ष अधिकारी आयव्हा फर्नांडिस यांची बदली केली. मडगावच्या होलसेल मासळी मार्केटात त्यांनी फोर्मालीन माफीयांवर कारवाई सुरू केल्यानेच सरकारने त्यांना छळले. आमचे सरकार एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची नेमणूक करुन लोकांना फोर्मालीन मुक्त मासळी उपलब्ध करुन देणार आहे असे गिरीश चोडणकर यांनी सांगितले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: