गोवा 

‘बहुजन व दलितांसाठी न्याय मागणे अपराध आहे का?’

पणजी :
गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी नेहमीच बहुजन समाजाला स्वावलंबी बनविण्याची दूरदृष्टी ठेवली व त्यांना अग्रस्थान देण्याचा प्रयत्न केला. बहुजन व दलितांच्या हक्कांसाठी लढणे हे प्रत्येक नागरीकाचे कर्तव्य आहे. बहुजन समाज व दलितांसाठी न्याय मागणे हा भाजप सरकारात गुन्हा ठरत असेल तर तो मी पुन्हा पुन्हा करेन असे विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी म्हटले.

आज गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांच्या पुण्यतिथी दिनी त्यांनी मिरामार येथे भाऊसाहेबांची समाधी व पणजी येथील पुतळ्याला हार घालुन श्रद्धांजली वाहिली. यावेळी मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर, मडगावच्या उपनगराध्यक्ष दिपाली सावळ, म्हापसाचे नगरसेवक सुधीर कांदोळकर, पणजीचे नगरसेवक ज्योएल आंद्राद, मडगावचे नगरसेवक दामोदर शिरोडकर, लता पेडणेकर, दामोदर वरक, सगुण नायक, सिद्धांत गडेकर तसेच इतर हजर होते.

आज भाऊसाहेबांच्या पुण्यतिथी दिनीच माझे ट्विटर खाते बंद करण्यात आले आहे. आमचे नेते राहुल गांधी यांनी लैगिंक अत्याचाराला बळी पडलेल्या एक नऊ वर्षाच्या दलित मुलीला न्याय मागणारे एक ट्विट केले होते व सदर मुलीच्या पालकांसोबत आपला फोटो सदर ट्विट बरोबर जोडला होता. त्या नंतर राहुल गांधी यांचे ट्विटर खाते बंद करण्यात आले होते. राहुल गांधीं यांनी व्यक्त केलेल्या भावनांना पाठिंबा देण्यासाठी मी ट्विट केल्यानंतर आज माझे ट्विटर खाते बंद करण्यात आले आहे असे दिगंबर कामत यांनी सांगितले.

बहुजन समाज, दलित यांना न्याय देण्यासाठी तसेच गोव्याची अस्मिता राखण्यासाठी आवाज उठविणे हा भाजप सरकारात गुन्हा ठरला आहे. आज भाऊसाहेबांच्या पुण्यतिथीला बहुजन समाजाच्या हक्कासाठी व गोव्याची अस्मिता सांभाळण्यासाठी लढण्याची मी शपथ घेतो असे दिगंबर कामत म्हणाले.

भाजप सरकार जनतेचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करीत आहे. लोकांच्या भावनांची सरकारला कदर नाही. महिलांचा सन्मान करणे हे सर्वांचे कर्तव्य व जबाबदारी असुन, दुर्देवाने सरकार त्यांचा आवाज दडपुन टाकत आहे असा आरोप दिगंबर कामत यांनी केला.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: