गोवा 

‘भाऊसाहेबांचे स्वप्न साकार करण्यासाठी मगोला विजयी करूया…’ 

पेडणे (निवृत्ती शिरोडकर) :
गोव्याचे भाग्यविधाते भाऊसाहेब बांदोडकर यांनी बहुजनांचा विचार करून सरकार स्थापन करताना गावागावात अज्ञान दूर करण्यासाठी विद्यामान्दिरे सुरु केली, त्यातील काही शाळा सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे बंद पडत आहेत. या शाळा वाचवण्यासाठी आणि जन विरोधी सरकारच्या जागी मगोचे सरकार आणण्यासाठी पेडणे तालुक्यातून दोन्ही मतदार संघात मगो पक्षाला विजय मिळवून देणे हीच खरी भाऊना श्रद्धांजली ठरणार आहे . भाऊसाहेब बांदोडकर यांचे स्वप्न साकार करुया असे आवाहन मगोचे नेते जीत आरोलकर यांनी मांद्रे येथे भाऊसाहे​​ब बांदोडकर यांची ४८ वी पुण्यतिथी मगो पक्षातर्फे साजरी करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी मगो केंद्रीय समितीचे सदस्य श्रीधर मांजरेकर, राघोबा गावडे, मगो नेते प्रवीण आर्लेकर , प्रवक्ते उमेश तळवणेकर, अमृत आगरवाडेकर, माजी सरपंच अश्वेता मांद्रेकर, सुदीप कोरगावकर, नरेश कोरगावकर, आपा तेली, प्रवीण वायगणकर, सरपंच सुभाष आसोलकर, नारायण सावंत, दयानंद मांद्रेकर, गोपीचंद आपुले, आदी उपस्थित होते.

मगोचे नेते प्रवीण आर्लेकर यांनी बोलताना बांदोडकर हे गरिबांचे नेते होते, त्यांनी बहुजन समाजासाठी विविध योजना उपक्रम राबवले  आहेत.  गरिबांसाठी त्यांचे व्हिजन होते ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण या पक्षात त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रवेश केल्याचे सांगितले . भाऊंचे चांगले विचार आणि विजन घेवून आम्ही कार्य करुया असे आवाहन केले .

मगोचे प्रवक्ते उमेश तळवणेकर यांनी बोलताना मगोच्या विरोधी पक्षाने बहुजन समाजाचा केवळ सत्ता उपभोगण्यासाठी वापर केला. बहुजन समाजात फुट घालण्याचे काम केल्याचा आरोप करून विद्यमान सरकारला खाली खेचून परिवर्तन मगो तर्फे करुया असे आवाहन तळवणेकर यांनी केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: