गोवा 

फातोर्डातील तरुणांचा ​आम ​आदमी पक्षात प्रवेश

​मडगाव :

​​जागतिक युवा दिनानिमित्त फातोर्डामधील ६० युवकांनी आप गोवामध्ये प्रवेश केला. आप गोवा नेते आणि फातोर्डा विधानसभा प्रभारी संदेश तेलेकर देसाई यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. गोव्यातील भाजप आणि काँग्रेसच्या खोट्या आश्वासनांना कंटाळूनच तरुणांनी आपमध्ये प्रवेश केला. त्यांना वाटते की गोव्याच्या उज्वल भविष्यासाठी आप ही एकमेव आशा आहे आणि ते खरेच आहे. त्यांनी ठरवले की जे झाले ते पुरे आहे ,आणि सत्तेत असलेल्यांच्या राजकारणाचा त्यांना कंटाळा आला आहे.

सामान्य गोयकारांनी नोकऱ्या गमावल्या, व्यवसाय गमावला याउलट सत्ताधारी राजकारणी अधिकाधिक श्रीमंत झाले. गोवेकारांना कोरोना महामारीने ग्रासले आहे, मात्र फातोर्डाचे आमदार आणि इतर राजकारण्यांनी फातोर्डाच्या रहिवाशांकडे दुर्लक्ष केले आहे. या कठीण काळात फातोर्डाच्या रहिवाशांच्या पाठीशी फक्त आपच उभे राहिले. आपने त्यांना या कठीण काळात ऑक्सिमीटर, ऑक्सिजन कॉन्स्ट्रेशन तसेच रेशन पुरवले. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की फातोर्डाचे विद्यमान आमदार विजय सरदेसाई यांनी भाजपविरोधात प्रचार करून त्यांची जागा जिंकली आणि निवडणुकीनंतर लगेच ते स्वतःच भाजपमध्ये सामील झाले.

फातोर्डा मधील बहुतेक रहिवासी याकडे मतदारसंघाचा आणि गोव्याचा विश्वासघात म्हणून पाहतात. सामान्य गोवेकरांना मदत करण्यास नकार देणारे आमदार व माजी आमदार सगळा वेळ घरी लपून राहातात त्यामुळे देखील येथील रहिवासी संतापले आहेत.

गोवेकर युवकांना आज त्रास होत आहे, कारण सरकारने त्यांना नोकऱ्या देण्यास नकार दिला आहे आणि जरी ते महाविद्यालयात असले, तरीही त्यांनी ऑनलाइन शिक्षणासाठी नेटवर्क शोधत आपला जीव धोक्यात घालणे सरकारला अपेक्षित आहे.

गोवा रोजगार विनिमय केंद्रात १.५ लाख नोंदणी मोठ्या प्रमाणावर पाहिल्यावर समजून येते, की सावंत सरकारची आतापर्यंत मदत करण्याची कोणतीही योजना नाही.

विद्यार्थ्यांना पुरेशी साधने न पुरवल्याने तसेच नेटवर्क समस्येमुळे गोव्यातील ई-लर्निंग शिक्षण पद्धतीला अपयश आले आहे. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याला जास्त तोंड द्यावे लागत आहे. याचा परिणाम त्यांच्या शिकण्यावर आणि नोकरीच्या संधीवर होतो.

दुसरीकडे, दिल्ली सरकार त्यांच्या विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनवण्यासाठी आणि त्यांना नोकऱ्या शोधण्यात मदत करण्यासाठी अनेक कौशल्ये कार्यक्रम शिकवते.

​​

यावेळी तेलेकर देसाई म्हणाले की “फातोर्डातील तरुणांनी ठरवले आहे की आता बस्स झाले. ते सध्याच्या राजकारण्यांच्या ‘घातकी आणि पातकी ‘ राजकारणाला कंटाळले आहेत. आमच्या मदत कार्यादरम्यान अनेक तरुणांनी आमच्यापर्यंत संपर्क साधला आणि एक चांगला गोवा बनवण्यासाठी एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली.”

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: