मुंबई सातारा 

जत तालुक्यासाठी ६ टीएमसी पाणी देण्याचे आदेश

मुंबई (अभयकुमार देशमुख):
राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांचा एका मागोमाग एक महत्वपूर्ण निर्णय घेत कामाचा धडका सुरूच आहे. आज त्यांनी दुष्काळग्रस्त जत तालुक्यासाठी ६ टीएमसी पाणी देण्याचे जाहीर करत स्वर्गीय राजारामबापू पाटील यांचे स्वप्न पूर्ण केले आहे.

वारणा प्रकल्पाच्या मंजूर बिगर सिंचन तरतूदीतील विनावापर ६ टीएमसी पाणी दुष्काळग्रस्त जत तालुक्यासाठी देण्याचे आदेश जलसंपदा विभागामार्फत कृष्णा खोरे विकास महामंडळास कळवण्यात आले आहे. यावर अधिक माहिती जयंतराव पाटील यांनी ट्विट करत दिली आहे.

गेली अनेक वर्षे सांगली जिल्ह्यातील दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या जत तालुक्यातील ६५ गावे पाण्यापासून पुर्णपणे वंचित होती. या गावांना कायमस्वरूपी सिंचनाखाली आणण्यासाठी एकूण ६ टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याबाबत बुधवारी जलसंपदा विभागामार्फत कृष्णा खोरे विकास महामंडळास कळविण्यात आलेले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून या गावांना पाणी द्यावे, अशी मागणी होती. त्याअनुषंगाने आज आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे विस्तारीत म्हैसाळ योजनेचा मार्ग मोकळा झाला आहे.

जत तालुका कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचे आदरणीय राजारामबापूंचे स्वप्न या निमित्ताने पुर्ण होत आहे याचा मला व सांगली जिल्हावासीयांना मोठा आनंद आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: