गोवा 

‘भाऊसाहेबांनी चालवला प्रबोधनाचा वारसा’

पेडणे (निवृत्ती शिरोडकर) :
महात्मा फुले यांनी म्हटले होते,विद्येविना मती गेली,मती विना गती गेली,गती विना वित्त गेले,वित्ताविना शुद्र खचले,एवढे अनर्थ एका अविद्येने केले. भाऊसाहेब बांदोडकर यांनी महात्मा फुले वाचले होते कि माहित नाही.परंतु हा जो काही बांदोडकर यांनी बहुजनसमाजाच्या प्रबोधनाचा वसा व वारसा एका प्रतिकूल परिस्थितीतून चालवला, शाहूमहाराज, महात्मा फुले, गाडगे महाराज आणि डॉक्टर आंबेडकर या प्रबोधनकारांचा अर्क भाऊसाहेब बांदोडकर यांच्या कृतीत आणि विचारात होता असे प्रतिपादन पत्रकार प्रभाकर ढगे यांनी बांदोडकर व्याख्यानेमालेत केले.

दरवर्षी मांद्रे विकास परिषद ,बांदोडकर व्याख्यानमाला हि भाऊसाहेब बांदोडकर यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित करतात. त्यामध्ये प्रभाकर ढगे बोलत होते. यावेळी मांद्रे विकास परिषद चेअरमन रमाकांत खलप, प्रा. अरुण नाईक, अजय देसाई, सरपंच सुभाष आसोलकर, माजी जिल्हासदस्य श्रीधर मांजरेकर व अमित सावंत उपस्थित होते.

विकास परिषद मांद्रे, सप्तेश्वर इन्स्टिट्यूट, मांद्रे कॉलेज ऑफ कॉमर्स शिक्षणिक संस्थेचा सप्ताह साजरा केला जात आहे, आणि या सप्ताहात दरवर्षी व्याख्यानमाला आयोजित केल जाते. त्यानुसार यंदा बांदोडकर पुण्यतिथी निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

प्रभाकर ढगे यांनी पुढे बोलताना भाऊसाहेब बांदोडकर यांच्याविषयी अनेक प्रसंग आहे. राजाराम रंगाजी पैगीणकर यांनी गोमंतक मराठा समाजाविषयी खूप काही लिहिले. त्यांनीही भाऊसाहेब बांदोडकर याना राजकारणात आणले. समाजकारणातून राजकारणाचा प्रवास बांदोडकर यांनी सुरु केला. गोवा सर्वाथाने प्रगतीवर आणण्याचे काम त्यांनी केले. मानावतावादीचा गौरव करून समानतेचे काम भाऊनी केले.  राजकारणापेक्षा समाजकारण मानणारे भाऊ होते. संसदेसमोर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारला त्यात त्या काळात त्या पुतळ्यासाठी भाऊसाहेब बांदोडकर यांचे पंचवीस हजार रुपयांचे योगदान आहे असे ढगे यांनी सांगितले.

सध्या जी नवीन शिक्षण पद्धत सुरु केली आहे ती चुकीचा इतिहास नव्या पिढीसमोर देण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यासाठी आता जागृती करून शिक्षण प्रणालीचा अभ्यास करण्याचे आवाहन ढगे यांनी सांगितले.

दरम्यान, माजी केंद्रीयमंत्री रमाकांत खलप यांनी बोलताना भाऊसाहेब बांदोडकर यांचे चरित्र पत्रकार प्रभाकर ढगे यांनी लिहावे असे आवाहन केले. राजकारणात आपण आमदार मंत्री खासदार असो नसो जे कार्य आहे ते आपण याही पुढे चालूच ठेवणार असल्याचे सांगितलले. आपण कधी राजकारण करत नाही समाजकारण करतो. समाजाप्रती भावना आहे ते प्रतिबिंब कार्यातून दिसते. भाऊंचे शिक्षणावरचे प्रेम होते, ते मंत्री होण्यापूर्वीही ते शिक्षणावर प्रेम करायचे , त्याचे किस्से माजी मंत्री रमाकांत खलप यांनी सांगितले .

अनघा आजगावकर व वरदा तळकर यांनी पाहुण्याचे स्वागत केले. प्रा. अरुण नाईक यांनी बांदोडकर विषयी महत्वपूर्ण माहिती दिली.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: