कला-साहित्यपुणे 

‘वाट तुझ्या पावलांची’चे महापौरांच्या हस्ते अनावरण

​​पुणे​ (अभयकुमार देशमुख) :

येत्या स्वातंत्र्य दिनानिमित्त  “वाट तुझ्या पावलांची”या महिला सशक्तीकरणावर आधारित गाण्याचे अनावरण महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते क​​रण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सोल्जर इंडिपेंडंट रिहाबिलीटेशन  फाउंडेशन संस्थेच्या सुमेधा चिथडे, वीरपत्नी शीतल जगदाळे ,वीरपत्नी कुंदना आगवण, वीरपत्नी जयश्री शेळके,वीरपत्नी अजिता बागडे,वीरपत्नी सोनाली फराटे उपस्थित होत्या, यावेळी वीर पत्नींचा सन्मान करण्यात आला.

लग्न हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यात येणारा एक वेगळाच प्रसंग. लग्नानंतर प्रत्येक मुलगी आपल्या आयुष्यात वेगवेगळी सुंदरशी स्वप्न रंगवते. देशासाठी लढणाऱ्या एका शूरवीराशी लग्नगाठ बांधलेल्या मुलीच्या मनात मात्र एक वेगळीच हुरहूर असते. अर्धांगिनी म्हणून वेगळीच लढाई लढणाऱ्या वीरपत्नींची भूमिका या गाण्यातून मांडण्यात आलीय. ‘वाट तुझ्या पावलांची’ या  गाण्याचं दिग्दर्शन पंकज सतीश साठे यांनी केलय.

​​

दर्जेदार विषय, मनाला भिडणारा अभिनय आणि डोळ्याच्या कडा ओलावणारी मांडणी अशा तिन्ही महत्त्वाच्या पैलूंचा समावेश असणाऱ्या ‘वाट तुझ्या पावलांची’ हे गीत युट्युब चॅनेल वर पाहिला मिळेल.

पतीच्या निधनानंतर आई-वडील अशा दोन्ही भूमिका ती कशी निभावते, याचे भावस्पर्शी वर्णन, आणि संगीतकर अमोल घाटे यांनी ओघवत्या शैलीत केले आहे. तर या गीताला कांचन घाटे यांचे स्वर लाभले आहेत. सायली गिते, अविनाश खेडेकर, ऐश्वर्या शिंदे, मॅडी शेख, या कलाकारांनी यात भूमिका साकारल्या आहेत.

एका लढवय्याशी लग्न करून आपली स्वप्न रंगवणाऱ्या एका महिलेची ही गोष्ट आहे. एक पत्नी म्हणून एक आई म्हणून आणि एक स्त्री म्हणून, तिने सोसलं आणि घडवलंही. ती मात्र शेवटी एकटीच राहिली. मात्र ती हरली नाही. ती पुन्हा कशी उभी राहिली आणि नवीन पिढीच्या पावलांना तिने कशी वाट दाखवली, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे ‘वाट तुझ्या पावलांची’ या गीतातून मिळाली.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: