गोवा 

​’​आमदाराने प्रामाणिक विकास जनतेपर्यंत पोचवला​’​

​​पेडणे ​(निवृत्ती शिरोडकर​) :
मांद्रे मतदारसंघातील जनतेने निवडून दिलेल्या आमदाराने आतापर्यंत प्रामाणिक विकास लोकापर्यंत पोचवलेला आहे. लाडली ​लक्ष्मीद्वारे मांद्रे मतदारसंघात ६ कोटी पोचले असल्याचे सांगून तुम्ही निवडून दिलेला आमदार फक्त कामे करतो असे आमदार दयानंद सोपटे यांनी मांद्रे येथील जिल्हा पंचायत सभागृहात मतदार संघातील लाडली ​लक्ष्मी लाभार्थीना प्रमाणपत्रे , जेष्ठ नागरिकाना ओळखपत्रे व वादळातील नुकसानी झालेल्याना मुख्यमंत्री निधीतून आर्थिक मदत कार्यक्रमात १२ रोजी केले.

यावेळी मांद्रे भाजपा मंडळ अध्यक्ष मधु परब, तुये सरपंच सुहास नाईक, पार्से सरपंच प्रगती सोपटे, माजी सरपंच प्रदीप परब, मांद्रे भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष दीपा तळकर, उपाध्यक्ष अनिशा केरकर, राज्य महिला उपाध्यक्ष एकता चोडणकर, उत्तर गोवा महिला अध्यक्ष  नयनी शेटगावकर, माजी सरपंच तारा हडफडकर, माजी सरपंच संतोष बर्डे​​ आदी उपस्थित होते.

स्वागत सूत्रसंचालन पार्से सरपंच प्रगती सोपटे यांनी केले. आमदार दयानंद सोपटे यांनी बोलताना कार्यकर्त्ये मतदार सरपंच , पंच यांच्या सहकार्यातून विकास चालू आहे . पक्षाच्या आणि सरकारच्या माध्यमातून विकास केला जात आहे.

दोन आमदार सक्रीय ; आमदार सोपटे
आमदार दयानंद सोपटे यांनी बोलताना आपण कधी आपली पाठ थोपटून घेत नाही तर भाजपची राज कार्यकारिणी समिती आहे , आणि त्या समितित असलेले जेष्ठ नेते आणि मांद्रे भाजपचे निरीक्षक गोरख मांद्रेकर म्हणतात राज्यात चाळीस आमदारापैकी भाजपाचे तुमचा मान्द्रेचा आमदार दयानंद सोपटे आणि मंत्री मायकल लोबो हे सक्रीय आहेत आणि तेच लोकांची जनहिताची कामे करतात असा उल्लेख निरीक्षक गोरख मांद्रेकर कार्यकारिणी समितीच्या बैठकीत करत असतात असा उल्लेख केला .

महिला मोर्चा अध्यक्ष दीपा तळकर यांनी बोलताना विकासाला प्राधान्य देणारे आमदार दयानंद सोपटे यांच्या माध्यमातून मतदार संघातील घराघरात लाडली लक्ष्मी, ​गृहआधार म्हणा किंवा दयानंद सामाजिक सुरक्षा योजने अंतर्गत  सरकारचा पैसा पोचवण्याचे कार्य लोकप्रतिनिधी करत आहे. आणि नव्याने जोमाने काम करण्यासाठी पुन्हा एकदा येणाऱ्या निवडणुकीत आमदार सोपटे  याना विजयी करण्याची गरज असल्याचे सांगितले.

मांद्रे माजी सरपंच तारा हडफडकर यांनी बोलताना आमदार दयानंद सोपटे यांच्या कार्याची दखल घेवून आणि महिलाना आमदारामार्फत मदत करता यावी यासाठी आपण भाजपात प्रवेश केला आहे. त्यांच्या माध्यमातून आपल्याला अनेकाना मदत करता येते असे  तारा हडफडकर यांनी सांगितले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: