मुंबई 

‘मिट्राक्लिप’मुळे मिळाले शेतकऱ्यास जीवनदान

नवी मुंबई​ :
अपोलो हॉस्पिटल्सने एका ४१ वर्षांच्या शेतकऱ्यावर मिट्राक्लिप (MitraClip) रोपण यशस्वीपणे करण्यात आली. सदर रुग्ण हृदय प्रत्यारोपणासाठी गेल्या तीन महिन्यांहून जास्त काळापासून इतर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये वाट पाहत होता. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काही दिवसातच ते आपल्या पायांनी चालत घरी गेले आणि आता कदाचित त्यांना हृदय प्रत्या​​रोपणाची गरज देखील भासणार नाही. भारतात मिट्राक्लिप (MitraClip) प्रक्रिया सर्वात पहिल्यांदा तीन वर्षांपूर्वी आणली गेली. जगातील पहिले मिट्राक्लिप रोपण युएसमध्ये २००३ साली करण्यात आले. तेव्हापासून ही प्रक्रिया अतिशय क्रांतिकारी ठरली.  युरोपमध्ये २००८ साली तर युएसमध्ये २०१३ साली व्यावसायिक स्तरावर ती उपलब्ध करवून दिली गेली. आज जगभरातील ५० पेक्षा जास्त देशांमधील एक लाख रुग्णांवर मिट्राक्लिप प्रक्रिया करण्यात आली आहे.

अपोलो हॉस्पिटल्सचे सिनियर इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्टस डॉ. साई सतीश यांनी सांगितले, “मिट्राक्लिप (MitraClip) ही धातूची छोटी क्लिप असते, त्यासोबत पॉलिएस्टर कापड असते, गळती होत असलेले मिट्रल वाल्व दुरुस्त करण्यासाठी योग्य जागी बसवली जाते आणि त्यामुळे रक्त प्रवाह योग्य दिशेने वाहू लागतो.  हृदय निकामी झालेल्या रुग्णांसाठी ही जागतिक पातळीवर स्वीकारण्यात आलेली प्रक्रिया आहे. मध्यम ते गंभीर किंवा गंभीर प्राथमिक आणि दुय्यम मिट्रल रीगर्जिटेशनने आजारी असलेले असे रुग्ण जे वैद्यकीय उपचारांनी बरे होऊ शकत नसतील ते या थेरपीचा पर्याय स्वीकारू शकतात, या थेरपीमध्ये शरीराला दिल्या जाणाऱ्या चिरा, छेदांचे प्रमाण खूप कमी असते आणि ही प्रक्रिया रुग्णाच्या आरोग्यात आणि एकंदरीत जीवनशैलीच्या गुणवत्तेमध्ये लक्षणीय परिवर्तन घडवून आणू शकते.”

 

पारंपरिक ओपन हार्ट शस्त्रक्रिया ज्यांच्यावर केली जाऊ शकत नाही अशा अशक्त प्रकृतीच्या व वयस्क रुग्णांना नवे जीवन देण्यात मिट्राक्लिप (MitraClip) रोपणाने खूप योगदान दिले आहे.  शरीरावर दिल्या जाणाऱ्या चिरा आणि छेद यांचे प्रमाण कमीत कमी असलेली मिट्राक्लिप प्रक्रिया ही प्रक्रियात्मक व झीज झाल्यामुळे होणाऱ्या मिट्रल रीगर्जिटेशनमध्ये खूप प्रभावी ठरते. ही प्रक्रिया कॅथ लॅबमध्ये परक्यूटेनियसली केली जाते आणि हे डिव्हाईस नंतर काढण्यायोग्य व पुन्हा स्थापित करण्यायोग्य असते. हे महत्त्वाचे गुण या प्रक्रियेची सुरक्षा अधिक जास्त वाढवतात.  प्रक्रियेची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी रुग्णांची निवड काटेकोरपणे केली जाणे आवश्यक ठरते. पारंपरिक शस्त्रक्रियेशी तुलना करता मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर पुन्हा-पुन्हा रुग्णालयात भरती व्हावे लागत नाही. त्यामुळे दीर्घ कालावधीचा विचार केला तर ही प्रक्रिया कमी खर्चिक ठरते आणि रुग्णांना सर्वसामान्य जीवन पुन्हा जगण्यास सुरुवात करता येते.

अपोलो हॉस्पिटल्स ग्रुपच्या कार्यकारी उपाध्यक्षा प्रीता रेड्डी यांनी सांगितले, “मिट्राक्लिप (MitraClip) प्रक्रिया करण्यासाठी प्रमाणित करण्यात आलेल्या भारतात हृदयरुग्णांच्या एकूण संख्येत अति गंभीर टप्प्याचा हृदय रोग असलेल्या रुग्णांचे प्रमाण १०% आहे. संशोधनातून असे दिसून आले आहे की, प्रत्यारोपणासाठी हृदय उपलब्ध होईपर्यंत हृदयाला सहायक म्हणून, अचानक हृदय बंद पडून रुग्णाचा जीव जाऊ नये म्हणून मिट्राक्लिपचा वापर करणे सुरक्षित आहे आणि मिट्राक्लिप रोपणामुळे अशा काही कार्यात्मक सुधारणा घडून येऊ शकतात की त्यामुळे रुग्ण बरे होऊन प्रत्यारोपण प्रतीक्षा यादीतून बाहेर देखील पडू शकतात.  गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळापासून प्रतीक्षा यादीमध्ये असलेल्या ४१ वर्षीय पुरुष रुग्णाच्या केसमध्ये अपोलो हॉस्पिटल्सने हे करून दाखवले आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो.”

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: