गोवा 

मोरजी ते पणजी धावणार ‘कदंबा’

पेडणे (निवृत्ती शिरोडकर) :
जनहितासाठी सरकार आपला आर्थिक फायदाही न पाहता जनसेवेसाठी कदंबा बस सेवा आज पर्यंत कार्यरत आहे. त्याचाच एक भाग म्हणून लोकांच्या मागणीनुसार मोरजी ते पणजी अशी कदंबा बससेवा सुरु केली आहे. त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांनी १२ रोजी टेंबवाडा मोरजी येथे मोरजी ते पणजी अशी कदंबा प्रवासी सेवेचे उद्घाटन केल्यानंतर केले.

यावेळी मोरजी सरपंच वैशाली शेटगावकर, पंच पवन मोरजे, पंच मुकेश गडेकर, पंच सुप्रिया पोके, माजी सरपंच मंदार पोके, दिनकर हलणकर, माजी सरपंच धनंजय शेटगावकर आदी उपस्थित होते.

आमदार दयानंद सोपटे यांनी पुढे बोलताना भाजपा सरकार सदोदित सर्वसामान्य नागरिकांचे हित पाहत आहे. कोरोना काळात अनेक प्रवासी बसेस बंद असल्याने नियमित काम धंदा निमित्ताने बाहेरगावी तालुक्याबाहेर जातात त्याना नियमित बसेस नसल्याने त्यांची बरीच धांदल होते. लोकांची गैरसोय लक्षात घेवून हि सेवा सुरु केल्याचे त्यांनी सांगितले.

मोरजी सरपंच वैशाली शेटगावकर यांनी बोलताना नागरिकांची गैरसोय लक्षात घेवून आमदार दयानंद सोपटे यांनी बससेवा सुरु केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. आमदार दयानंद सोपटे यांच्या कार्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. विकासाची दारे उघडण्यासाठी त्यांचे प्रयत्न अविरत चालू असल्याने व नागरिकांच्या समस्या कश्या सोडवाव्यात याकडे त्यांचा कटाक्ष असतो असे त्या म्हणाल्या.​

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: