सातारा 

साताऱ्यात मटक्याचा राजरोस कारभार

​​सातारा ​(महेश पवार) :

शहरातील मटका किंग समीर कच्छी विरोधात अनेकदा तक्रारी झाल्या परंतु पोलिस एकतर कारवाई करत नाहीत आणि केली तर ती फक्त नावालाच करतात​.  यामुळेच मुजोर समीर कच्छीचे सातारा शहरातील व ग्रामीण भागातील मटका तेजीत आहे. अनेक सामाजिक कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिकांनी तक्रारी केल्या आंदोलनाचे हत्यार उपसले पण सातारा पोलीसांना मटका सत्तेवरून हटवता आला नाही .

सातारा शहरातील राजवाडा, मोळाचा ओढा, शनिवार चौक तेली खड्डा , गुरुवार परज ,वर्ये रामनगर ,सैदापूर, वाढे फाटा , बॉम्बे रेस्टॉरंट चौक ,शिवराज पेट्रोल पंप , शेंद्रे,बोगदा ,परळी यासह जिल्ह्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणावर मटके अड्डे चालवले जात आहेत. जिथं जिथं मटका घेतला जातो ती ठिकाणं पोलिस चौकी , नव्हं तर जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर असुन सुद्धापोलिस कारवाई करत नाहीत?​ ​असा सवाल नागरिक करत आहेत​. 

एकीकडे साधं दुकान लॉकडाऊन मध्ये उघडले तर पोलिस फौजफाटा घेऊन कारवाई करण्यासाठी येतात पण ​हे अवैध धंदे बंद करायला नक्की पोलीसांनी डोळ्यांवर पट्टी बांधून घेतली की काय​? असा प्रश्न निर्माण होत आहे. पोलिसांचे अभय असल्यामुळेच समीर कच्छी सारखा मटका किंग सातारा पोलीसांच्या मानगुटीवर ​बसून राजसोसपणे आपली सत्ता बळकट करत असल्याची भावना व्यक्त होत आहे. 
सातारा पोलिसांना याकडे लक्ष देणे कठीण जात असेल तर, आता गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी लक्ष घालावे आणि नागरिकांना दिलासा द्यावा असे आवाहन स्थानिकांनी केले आहे.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: