सातारा 

कधीही आमदार, खासदार न पाहिलेल्या गावात पोहोचली शिवसेनेची मदत

सातारा (महेश पवार) :
सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील शेवटचे टोक असणार्या वेळे,मायणी, ताळदेव, गावांत आज शिवसेनेच्यावतीने उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते अन्नधान्यचे किट घेऊन मदतीला पोहचले.

भीषण पावसामुळे या गावांवर मोठेच संकट कोसळले होते. अत्यंत दुर्गम ठिकाणी असलेल्या या गावांत आजवर आमदार, खासदार सोडा पण पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद सदस्य देखील या लोकांनी कधी बघितलेला नाही.  अशा वेळे गावाच्या मदतीला शिवसेना धावली असून, ‘माझे नाव शिवसेना’ हा फक्त निवडणुकीचा नारा नसून खरी मदत असल्याचे दाखवून दिले. सचिन मोहिते यांनी या गावात बोटीने जाऊन डोंगर माथ्यावर चढून अन्नधान्याची किट ,रजई , गोळ्या औषधे पोहचवली व लोकांना अस्मानी संकटातुन बाहेर पडण्यासाठी मदत केली.

 

वेळे हे गाव कोयना धरणाच्या बॅकवॉटरच्या किनाऱ्यावर असलेल्या सह्याद्रीच्या विस्तिर्ण डोंगराच्या कुशीत वसलेले आहे. याठिकाणी रस्ता सोडा साधी पायवाटसुध्दा व्यवस्थित नाही. या गावाला दळणवळणाची सुविधा मिळते ती कित्येक मैलांवर किंवा बोटीच्या सहाय्याने. सध्या तर बोटिंग प्रवासाला ही बंदी घालण्यात आली आहे. यामुळे याठिकाणी राहणा-या लोकांना जगणं मुश्किल झाले आहे. अशावेळी सचिन मोहिते यांच्यामाध्यमातून हि बहुमोलाची मदत पोहोचल्याबद्दल गावकऱ्यांनी शिवसेनेचे आणि सचिन मोहिते यांचे आभार मानले आहेत.

स्थानिकांचे हे आणि असे विविध प्रश्न समजावून घेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मंत्री एकनाथ शिंदे  यांच्या कानावर घालून या नागरिकांना या वनवासातून बाहेर काढू असे आश्वासन यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी दिले. या प्रसंगी त्यांच्यासोबत संजय इंगवले,संजय कर्वे, लक्ष्मण सपकाळ,सिद्धार्थ  गोळे ,किशोर घोरपडे ,रामचंद्र पवार, आधी शिवसेना  कार्यकर्ते उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: