महाराष्ट्रमुंबई 

‘भाजपच्या भुलथापापासून देश स्वतंत्र राहिला पाहिजे’ 

मुंबई (प्रतिनिधी) :

राष्ट्रीय स्वंयसेवक संघ दरवर्षी १४ ऑगस्ट ला देशभर अखंड भारत दिवस साजरा करते. कालदेखील केला… अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘फाळणी वेदना स्मृतिदिना’चे नक्राश्रू कशासाठी आणि कोणासाठी दाखवत आहेत? असा रोकडा प्रश्न काँग्रेसचे कल्याण डोंबिवली शहर जिल्ह्याचे सरचिटणीस बी शामराव यांनी केला आहे. पंतप्रधान मोदींनी काल फाळणी वेदना स्मृतिदिनाची घोषणा केल्यानंतर देशभरातून विविध स्थरातून यावर मतमतांतरे व्यक्त होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर बी शामराव यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

शामराव पुढे म्हणाले कि, स्वतंत्र लढ्यामध्ये शून्य योगदान असलेला संघ आणि जनसंघाला (आजच्या भाजपला) ७५ वर्षांनंतर यांना आता फाळणीच्या आठवणी येत आहेत. कारण हिंदू मुस्लिम हे यांच्यासाठी निवडणुकीचे साधन आहेत. दोन धर्मामध्ये भांडणे लावायची, दंगे करायचे आणि त्या पेटलेल्या आगीवर स्वतःच्या स्वार्थाची पोळी भाजून घ्यायची, हा भाजपचा आजवरचा इतिहास.

द्वेषावर आधारित राजकारण करणाऱ्या लोकांच्या तोंडून माणुसकीची आणि वेदना- संवेदनेची भाषा पटत नाही… देशाच्या अखंडतेच्या आड नेहमीच येणार भाजप संपूर्ण देशाचा विचार फक्त मतपेटी म्हणून करतो, इथे हाडामांसाची  माणसे राहतात, याची त्यांना जाणीव नाही. देश माणसांनी बनतो… मतांमुळे फक्त सत्ता मिळते आणि ती जास्तीत जास्त पाच वर्षे टिकते… देश अबाधित राहिला पाहिजे. देश अखंड राहिला पाहिजे. आणि भाजपच्या फुटीरवादी भुलथापापासून देश स्वतंत्र राहिला पाहिजे, असे आवाहन शामराव यांनी यावेळी करत, नागरिकांना ७५ व्या स्वतंत्रदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: