सातारा 

‘झाडांमुळे दूर होतात निसर्गातील दोष’

कराड (अभयकुमार देशमुख) :
योगामुळे जसे चित्तामधील वृत्तीचा निरोध होतो तसेच निसर्गातील वृत्ती (दोष) वृक्षामुळे दूर होतात. म्हणूनच श्री. श्रीराम विष्णू साठ्ये यांच्या मार्गदर्शनाखाली चैतन्य योग साधना संस्था आणि महादेव कृषी उद्योग यांनी मैजे मेरवेवाडी या गावामध्ये वृक्षारोपण केले यात योगतील प्रकाश धोकटे,मनीष पाटील,मंगेश शेटके याच्या बरोबर बीऐएसफ कंपनीतील निखिल जाधव मेरवेवाडीतील सरपंच सुहास यादव, विशाल यादव  इतर ग्रामस्थ यांनी आपला सहभाग नोंदवला. आपल्या सर्वांच्या सहकार्याने स्वातंत्र्यच्या पूर्व दिनांकाचे औचित्य साधून 14 ऑगस्ट रोजी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आपल्या सहकाऱ्यांने संपन्न केला त्याबद्दल चैत्यन्य योग साधना,कराड चे संचालक प्रकाश धोकटे यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले तसेच पुढल्या कार्यक्रमात देखील आपल्या सर्वांना सहभागासाठी आवाहन केले आहे.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: