गोवा 

गोंयकारांना 16 हजार घनलीटर पाणी मोफत

पणजी: 

संपूर्ण देश आज स्वातंत्र्य दिनाचा (75th Independence Day) 75 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. या वर्षीचा स्वातंत्र्य दिन ‘आझादी का अमृत महोत्सव’ म्हणून साजरा केला जात आहे. संपूर्ण देश देशभक्तीने भारावून गेलाय. देशभरातील (India) विविध राज्यांमध्ये, मंत्रालये, लष्करी दले आणि सर्वसामान्याद्वारे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गोव्यातही (Goa) आज स्वातंत्र्याचा जयजयकार करण्यात आला आहे.

राज्यातील नागरिकांना प्रतिमाह येत्या 1 सप्टेंबरपासून 16 हजार क्युबिक घनलीटर पाणी प्रत्येक कुटूंबाला मोफत देण्याची महत्वाकांक्षी घोषणा आज मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी केली. अमृत महोत्सवी स्वातंत्र दिनानिमित्त येथील जुन्या सचिवालयासमोर तिरंगा फडकावल्यानंतर ते बोलत होते.

सुरवातीला मुख्यमंत्र्यांनी ध्वज फडकाविला. त्यानंतर पोलिस दलाकडून मानवंदना स्विकारली. पुढे बोलतांना ते म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवभारताचे स्वप्न पाहीले आहे, त्याच धर्तीवर आम्ही स्वयंपूर्ण गोव्याचा संकल्प केला आहे. तो सत्यात उतरविण्यासाठी गोमंतकीयांच्या सहकार्याची गरज आहे. राज्यावर अलिकडे कोविड महामारीसह अनेक संकटे आली. नैसर्गिक आपत्ती ओढवल्या तरी सरकारने हार मानली नाही. राज्यातील नागरिकांना हरप्रकारे मदत करण्यात आली आहे. यापुढील काळातही करकार त्यासाठी कटिबध्द आहे.

2019 सालापासून अंत्योदय तत्वाने प्रेरीत होऊन सरकार कार्यरत आहे. सरकारने विकासाचा नवा मापदंड घातला आहे. तरूणांच्या भवितव्याचा विचार करून कौशल्य विकास, तंत्रज्ञान विकास, व्हीडीओद्वारे शिक्षण, स्थानिक भाषांचा प्रचार आणि प्रसार, फॉरेन्सीक सायन्सला उभारी दिली आहे. कृषी क्षेत्रात राज्य स्वावलंबी व्हावे, यावर विषेश भर देण्यात आला असून 10 हजार हेक्टरमध्ये सेंद्रीय शेती केली जात आहे. त्यासाठी 12 हजार 389 शेतक-यांना अनुदान देण्यात आले आहे. कृषी क्रांतीचा उद्देश ठेऊन 650 तरूणांना निधी उपलब्ध करून दिला आहे. 65 हजार 133 किसान कार्डचे वितरण करण्यासह आतापर्यंत 9 हजार शेतक-यांना 19 लाखांची मदत केली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: