गोवा 

वानरमाऱ्यांच्या वस्तीवर पोहोचली सौर ऊर्जा, शिक्षणाची ‘नवचेतना’

​​पेडणे ​( निवृत्ती शिरोडकर​) :
मालपे पेडणे येथील डोंगर माळरानावर चार पिढ्या पासून वानरमारे आदिवासी एकूण ६० सदस्यांच्या सहा झोपड्या जमीनदार देवेंद्र देशप्रभू यांच्या जागेत मागच्या तीस वर्षापासून वास्तव्य करत आहेत, या ६० सदस्यना गोवा मुक्त होवून ६० वर्षे आणि भारत स्वतंत्र होवून ७५ वर्षे होत असतानाच आज पर्यंत राजकर्त्यांनी आणि सरकारने कोणत्याच योजना, पाणी, वीज, रस्ता इतर सुविधा, शिवाय सरकारची एकही योजना या आदिवासी कुटुंबियाना मिळत नाही.

 

पेडणे येथील एक अग्रेसर युवकांची संघटना असलेल्या नवचेतना युवक संघाने या आदिवासी कुटुंबियांच्या एकूण सहा झोपड्यांना सौर उर्जाचे दिवे आणि ज्या ९ मुला​-​मुली​ना शिक्षण घेताना त्याना वर्षभरासाठी लागणारे सर्व शिक्षणाचे सहित्य स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून विराज  हरमलकर यांच्या सहकार्यातून १५ रोजी वितरीत केले. जी मुले शिक्षण घेतात त्याना आठ​ ​दिवसातून एकदा  त्यांच्या झोपडीत सर्वशिक्षा अभियानचे शिक्षक येवून एक दिवस शिकवतात, हि मुले इंग्रजी आणि मराठी आकडे लिहिणे वाचणे मन लावून ​करत असल्याचे चित्र आहे. ​जिथे राज्यकर्ते व सरकार पोचत नाही. ​तिथे हे काम ​नवचेतना ​युवक संघाने हाती घेवून ​माणुसकीचे दर्शन घडवले आहे. ​

 

कोणत्याही पक्षाचे नेते असो ​वा सरकार असो, आपल्याला किती मते मिळणार यांचा विचार करून मतांची गणिते करत असतात. या आदिवासी कुटुंबीयांकडे एकही मत नसल्याने त्याकडे ​सगळेच दुर्लक्ष करत आहेत. या कुटुंबियाना पेडणेचा आमदार कोण, मुख्यमंत्री कोण, सरकार कोण चालवतो याची काहीच माहिती नाही.​ या कुटुंबियांची कुणीही निवडणूक आयोगाच्या मतदान नोंदणी करून त्याना मतदानाचा अधिकार दिला नाही.

​​

जंगलात वास्तव्य करून राहणारे हे आदिवासी कुटुंबीय शहरात जी जी कामे दिवसाकाठी मिळतात ती करून आपला उदरनिर्वाह चालवत असतात. काही मुले शिकतात​,​ काही मुले शिकत नाही. जी शिक्षण घेतात त्याना शैक्षणिक साहित्य वितरीत करण्यात आले.

यावेळी येथील जाणकार आदिवासी नागरिकांनी आपली प्रतिक्रिया देताना ​सगळ्यांचे आभार मानले. आमच्या झोपड्यात विजेचे दिवे आम्ही कधी पाहिले नव्हते, झोपड्यात काल रात्री दिवे पेटले आणि लहान लहान मुले हि लवकर झोपायची ती मुले रात्री दहा पर्यंत जागीच होती, विजेच्या दिव्यांचे ​त्यांना आश्चर्य वाटत होते. सरकारने आम्हाला न्याय द्यावा , आम्ही ​अडाणी आहोत मात्र आमची मुले ​तशीच राहता कामा नये. आम्ही सोसले ते मुलांनी सोसू नये सरकारने काहीतर आमच्यासाठी करावे अशी ​भावनिक साद या नागरिकांनी केली. 

नवचेतना युवक संघाचे अध्यक्ष कृष्णा पालयेकर यांनी बोलताना सरकार पातळीवर विविध योजना राबवतात, विविध प्रकल्प आणले जातात. मात्र या घटकाकडे कुणी डोळे उघडून पाहत नाही. नवचैतन्य विचार घेवून समाजसेवक विराज हरमलकर यांच्या सहकार्यातून या कुटुंबियाना आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. रात्रीच्या वेळी मुले झोपडीत झोपत होती त्यावेळी अनेक सरपटणारे प्राणी, जनावरे या झोपड्यात येत असे, अंधार असल्याने नक्की कुणाच्या हालचाली असतात ते कळणे कठीण होते. यावेळी विराज हरमलकर, ओंकार गोवेकर, किशोर किनळेकर, सिंथिया गावकर  व भगवान शेटकर आदींनी विचार मांडले.​​

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: