गोवा 

पेडणे वाहतूक अधिकाऱ्यांना बस मालक संघटनेचा घेराव

पेडणे (निवृत्ती शिरोडकर) :
खाजगी बस व्यवसायिकांच्या समस्या ऐकून न घेताच व विश्वासात न घेताच खाजगी बसेस चालू असतानाच त्याच वेळेला २ कदंबा ब ला परमिट देण्याचा अधिकार पेडणे वाहतूक अधिकाऱ्यांना आहे कि काय या विषयी अखिल गोवा बस मालकाच्या संघटनेने सुदीप ताम्हणकर यांच्या नैतृत्वाखाली १६ रोजी पेडणे वाहतूक सहाय्यक अधिकारी मेघश्याम पीळर्णकर याना घेराव घालून जाब विचारला. आणि कदंबा बसेसचे दोन्ही परमिट रद्द करण्याची मागणी केली.

सुदीप ताम्हणकर यांनी या वेळी अधिकाऱ्याला जाब विचारताना, खाजगी बसमालकांकडून परमिट साठी आणि स्वत:साठी वेगळे पैसे घेतात त्यावेळी कदंब बस ला परमीट देताना या खाजगी व्यवसायिकांची आठवण झाली नाही का असा सवाल उपस्थित केला.

वाहतूक खाते हा अधिकारी बसमालकांकडून कायदेशीर फी घेतोच शिवाय  सहा ते सात हजार रुपये हा अधिकारी खंडणी वसूल करतो असा आरोप केला. पेडणे अधिकाऱ्यांच्या हद्दीत किती किलोमीटर येते व कोणत्या हद्दीत परमिट दिले जाते पेडणे कार्यालयातून याचे उत्तर द्या अशी मागणी केली असता अधिकाऱ्यांनी व्यवस्थित उत्तर न दिल्याने बसमालक आक्रमक बनले. ज्ञान नसेल तर  खुर्चीवर का बसलात असा प्रश्न उपस्थित केला . आम्ही कदंबा सोबत भांडू का असा प्रश्न केला .

‘कदंबा’ला विरोध
मोरजी ते म्हापसा मांद्रे ते म्हापसा  कदंबा बस सेवा, सुरु केली. त्याचवेळी खाजगी बस प्रवास   सुरु असताना हि सेवा कशी काय सुरु केली असा सवाल केला . आमदाराने तुम्हाला  अतिरिक्त नोकरीत वाढ करण्याची किंवा मुलाला नोकरी देण्याची ऑफर दिली म्हणून तुम्ही आमदार सोपटे यांच्या दबावाला येवून कदंबा सुरु केली का असा आरोप केला.

अधिकाऱ्याने यावेळी संघटनेला आवाहन करताना तुमचे बसेस आहे ते त्यावेळेला चालवा अशी सुचना केली असता ताम्हणकर अधिक भडकले, दोन प्रवासी घेवून बस चालवू का, असा प्रश्न करून तुम्ही आम्हाला नुकसानभरपाई देत असाल तर आम्ही तसेच बसेस चालवू असे ताम्हणकर यांनी सांगितले. नाहीतर सोपटे  यांच्याकडून पैसे घेवून द्या आम्ही दोन प्रवासी घेवून बसेस चालू ठेवतो असे बसमालकांनी सांगितले .

सोपटेना लोकांची सहानभूती हवी
बसमालकांनी यावेळी बोलताना हा काळ निवडणुकीचा असल्याने आमदार दयानंद सोपटे याना लोकांची सहानभूती हवी आहे. त्यासाठी खाजगी प्रवासी बसेच्या वेळेला कदंबा बस सेवा सुरु केल्याचा आरोप बसमालक विठ्ठल यांनी केला. शिवाय कदंबा बसेसना सर्वकाही मिळते . कधीकधी कदंबा क्लीनर अर्धे पैसे घेवून प्रवाशाना सोडतो , त्यावर कुणाचा अंकुश नाही.

परमिट हंगामी स्वरूपाचे
बसमालकांनी आपल्या मागण्याचे या पूर्वीच निवेदन दिले होते त्याचे काय झाले, त्याविशयी आजपर्यंत बसमालकांची बैठक का बोलावली नाही. कदंबा बस ला दिलेले परमिट रद्द करा अशी मागणी केली असता, अधिकारी मेघश्याम यांनी हे परमिट हंगामी स्वरूपाचे आहे, त्यावर अभ्यास करून पुढील निर्णय घेवू, तुमचे काही निवेदन आहे तर ते लेखी स्वरूपात द्या अशी सुचना अधिकाऱ्यांनी बसमालक संघटनेला केली त्यावेळी  मालकांनी पूर्वी दिलेल्या निवेदनाचे  काय झाले त्याचे उत्तर द्या अशी मागणी केली.

पोलीस निरीक्षक जिवबा दळवी हजर
वाहतूक अधिकाऱ्याला घेराव घातल्याची माहिती पेडणे पोलीसाना मिळताच , घटनास्थळी तातडीने स्वतां पोलीस निरीक्षक जिवबा दळवी उपस्थित राहिले, त्याच वेळी सुदीप ताम्हणकर यांनी सांगितले कि जी कदंबा बस मोरजी ते म्हापसा पर्यंत घातलेली आहे. पेडणे वाहतूक अधिकाऱ्यांची हद्द मोरजी ते चोपडे पुला पर्यंत चार किलोमीटर अंतरावर संपते. त्यानंतर चोपडे  पूल क्रॉस केल्यावर म्हापसा वाहतूक खात्याची हद्द सुरु होते, तर मग पेडणे अधिकाऱ्याने शिवोलीमार्ग म्हापसा जाणाऱ्या कदंबला कसे परमिट दिले असा सवाल उपस्थित केला असता. पोलीस निरीक्षक बसमालकांचे  प्रश्न बरोबर असल्याचे मान्य करून हा विषय चर्चा करून सोडवावा अशी सुचना केली.

अधिकारी म्हणतात बसमालकांचे प्रश्न कार्यालयात येवून मांडा
बसमालकांच्या काही समस्या असतील तर त्या कार्यालयात येवून मांडाव्यात, बस मालकांनी परस्पर ग्रुप करून प्रवासी बसेल रोटेशन केले आहे त्याची माहिती कार्यालयात द्यायला हवी ती दिली का असा प्रश्न उपस्थित केला असता , बसमालकांनी यापुर्त्वीच निवेदन दिले त्यावर अजून कार्यवाही झाली नसल्याचा दावा बसमालकांनी केला.

अधिकारी पक्षपाती?
सुदीप ताम्हणकर यांनी आरोप्र करताना अधिकारी मोठ्या प्रमाणात लाच घेतात , पावसाळ्यात काही बसमालकांनी त्याना भाजी नेवून दिली होती तीही भाजी त्यांनी घेतली. परमिट साठी मोठी रक्कम ते घेत असतात असा आरोप केला . एखाद्यावेळी जर खाजगी बस त्यावेळेला किंवा सुट्टीच्या दिवशी बंद असेल तर त्यांच्यावर कारवाई होते, तर कदंबा बस वाहनावर का कारवाई केली जात नाही. असा प्रश्न बसमालकांनी उपस्थित केला..

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: