मुंबई 

‘आबा नसल्याचे दुःख कायम राहील’

मुंबई (अभयकुमार देशमुख) :
महाराष्ट्राच्या राजकारणातला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातला माझा सहकारी, जवळचा मित्र आज आपल्यासोबत नाही, याची खंत व दु:ख कायम मनात राहणार आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आबांना आदरांजली वाहिली.

ग्रामीण विकासाची आस, तंटामुक्त समाजाचा ध्यास घेऊन आर. आर. आबांनी राबवलेलं प्रत्येक अभियान लोकचळवळ बनलं. पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त भरती प्रक्रियेच्या आबांच्या निर्णयाने हजारो गरीब युवकांना पोलिस दलाची दारं खुली करुन दिली. डान्सबार बंदी, गुटखाबंदीच्या त्यांच्या निर्णयाने महाराष्ट्राच्या कित्येक पिढ्या वाचवल्या. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्याचं काम आर. आर. आबांनी यशस्वीपणे केले.

शहरी, ग्रामीण भागातील प्रत्येकाला आदर असलेलं, आपलंसं वाटणारं त्यांचं नेतृत्व होतं असं सांगत स्वर्गीय आर. आर. आबांच्या स्मृतींना जयंतीदिनी विनम्र अभिवादन केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: