सातारा 

​’​मटका किंग समीर कच्छीवर कारवाई करा’

सातारा (महेश पवार) :
शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी आज जिल्हा पोलिस प्रमुखांची भेट घेऊन मटका किंग समीर कच्छी वर लवकरात लवकर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन दिले . मटका किंग समीर कच्छी च्या अवैध चालू असलेल्या मटक्या मुळे अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत , त्यांच्यावर या आधी कारवाई केली गेली पण ती नावालाच , कारण समीर कच्छी चे धंदे बंद होण्या ऐवजी वाढतच गेले , यामुळे आता त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अन्यथा शिवसेनेला आंदोलन करावे लागेल.


मागील काही दिवसांत त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी झाल्या , अनेकांनी आत्मदहनाचे इशारे दिले ,  तरी देखील पोलिस प्रशासन समीर कच्छी वर कारवाई का करत नाही . या संदर्भात शिवसेनेनं आज जिल्हा पोलिस प्रमुखांची भेट घेत कठोर कारवाई करण्या संदर्भात निवेदन देऊन चर्चा केली , यावेळी जिल्हा पोलिस प्रमुखांनी लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले .या प्रसंगी तालुका प्रमुख अनिल गुजर, शहर प्रमुख निलेश मोरे,बाळासाहेब शिंदे, प्रणव सावंत, उपशहर प्रमुख अमोल गोसावी, किशोर घोरपडे, अजय सावंत , आदी  शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.​

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: