देश-विदेश

‘मणिपाल’मध्ये स्वातंत्र्य आणि समतेचा उत्सव साजरा

बंगळुरू :
 प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्र आहे, त्याच बरोबर त्यांना कोणत्याही अपवादा शिवाय स्वत:चे  अधिकार आहेत.  मणिपाल हॉस्पिटल्स  ने आज अनोख्या  पध्दतीने ७५ वा स्वातंत्र्य दिनाच्या  निमित्ताने ड्रॅग कल्चरच्या माध्यमातून एलजीबीटीक्यू समाजाचे विचार मांडणार्‍या तसेच त्यांच्या कार्याला मानवंदना देण्यासाठी पहिल्या एलजीबीटीक्यू सदस्य असलेल्या आदम पाशा यांच्या हस्ते ध्वजारोहण  केले.  मणिपाल हॉस्पिटल्स ने स्वातंत्र्यदिन हा नेहमीच स्वातंत्र्य आणि समानतेसाठी व नवीन मार्ग चोखाळण्याचा तसेच  सर्वसमावेशकतेचा प्रसार करण्याचा दिवस मानला आहे.  आदम पाशा यांनी जगभरातील समाजाला प्रोत्साहन दिले असून त्यांनी एलजीबीटीक्यू समाजाचे सामाजिक हक्क आणि समानतेसाठी मोठे  कार्य केले आहे.

यावेळी बोलतांना ओल्ड एअरपोर्ट रोड मणिपाल हॉस्पटल्स चे  हॉस्पिटल डायरेक्टर डॉ.मनीष राय यांनी सांगितले “ आमच्यासाठी सर्वात मौल्यवान मालमत्ता  म्हणजे आमची जनता आहे आणि आम्ही वि‍विधतेने नटलेल्या व सर्वसमावेशक अशा संस्कृतीचा अंगिकार केला आहे. या स्वातंत्र्य दिनी आम्ही आरोग्य क्षेत्रातील सर्वसमावेशकते वर जोर देत आहोत. आज आपल्या राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण केल्या बद्दल मी आदम पाशा यांच्या उपस्थिती बद्दल त्यांचा आभारी आहे.  त्यांची या कार्यक्रमातील उपस्थिती म्हणजे आरोग्य क्षेत्रातील समानतेचे प्रतिकात्मक यश आहे.”

आदम पाशा म्हणतात “ मणिपाल  हॉस्पिटल्स मध्ये मला ध्वजारोहणाची संधी मिळाली याबद्दल मी खूप आनंदी आहे.  हा सन्मान म्हणजे एलजीबीटीक्य समाजाचे स्वातंत्र्य आणि आरोग्य क्षेत्रातील सर्वसमावेशनाचे प्रतीक आहे. मणिपाल हॉस्पिटल्स कडून एलजीबीटीक्यू समाजासाठी प्राईड मंथची सुरूवात करून एलजीबीटीक्यू समाजाच्या लसीकरण मोहिमेचे प्रायोजकत्वही स्विकारले आहे.  यामुळे नक्कीच आमचा समाज आरोग्यपूर्ण आणि सुरक्षित राहण्यास  मदत झाली आहे.  या स्वातंत्र्य दिनी मी प्रत्येकाला विनंती करतो की स्वत:तील शंका दूर करा आणि त्यांच्यातील विचार  नक्की  व्यक्त करा.”

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: