सातारा 

‘कापील’च्या २४x७ शुद्ध पाणीपुरवठा योजनेचा गौरव

​​पालकमंत्र्यांच्या हस्ते चंदेरी प्रमाणपत्र प्राप्त

​​कराड ​(अभयकुमार देशमुख) :
कापील ता. कराड ग्रामपंचायतीचा भारतातील सर्वात पहिली AMR मिटरने चोवीस बाय सात शुद्ध पाणीपुरवठा करणारी ग्रामपंचायत म्हणून नावलौकीक आहे. सन २०१६ ते २०२० अखेर सलग पाच वर्षात कोणताही जलजन्य साथीच्या आजाराचा उद्रेक होऊ नये, म्हणून केलेल्या प्रयत्नासाठी स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री, जि. प. अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कापील नळयोजनेला चंदेरी प्रमाणपत्र देऊन गौरविले आहे. त्यामुळे गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०११ मध्ये कापील ग्रामपंचायतीच्या नळपाणी योजनेची महूर्तमेढ रोवण्यात आली. प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊन फेब्रुवारी २०१५ मध्ये गावाला शुद्ध पाणीपुरवठा सुरु झाला. यासाठी नळपाणी योजना कमिटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.त्यांना २००९ ते २०१४ व २०१४ ते २०१९ मध्ये कार्यरत असलेल्या ग्रामपंचायत ग्रामपंचायत कमिटी, सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य,पदाधिकारी,प्रशासकीय अधिकारी,पानी पुरवठा विभागाचे सर्व अधिकारी व ग्रामस्थानची मोलाची साथ मिळाली.

यातील प्रत्येक घटकाने नळयोजनसाठी जागा देणे, लोकवर्गनी,तांत्रिक अडचणी,प्रशासकीय कामे आदिंसाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले.गावाची साथ आणि सर्वांचे प्रयत्न यातून ही ग्रामीण भागातील पहिली शुद्ध 24 बाय 7 नळ योजना म्हणून संपूर्ण आशिया खंडात प्रचलित झाली आहे.या योजनेची दैदीप्यमान वाटचाल विद्यमान ग्रामपंचायत कमिटीच्या काळातही सुरु आहे. डिसेम्बर २०१९ मध्ये सदर नळपाणी योजनेची यशोगाथा पुणे येथे संपन्न झालेल्या जागतिक पाणी परिषदेतही मांडण्यात आली होती. आजही कित्येक अधिकारी,विद्यार्थी,विविध राज्यातील पदाधिकारी या आदर्श नळयोजनेला भेट देण्यासाठी गावात येत असतात.

कापील गावच्या २४X७ नळपाणी योजनेला मिळालेला हा सन्मान सन २००९ ते विद्यमान ग्रामपंचायत कमिटी, पाणी पुरवठा कमिटी, ग्रामस्थ, कर्मचारी व ज्ञात-अज्ञात कित्येक हातांच्या परीश्रमाचा हा आहे. यापुढेही चंदेरी सन्मानपत्रासारखाच गावचा विकास घडविण्यासाठीही नेहमीच प्रयत्नशील असणार आहे.
– नितिन ढापरे (ग्रामपंचायत सदस्य, कापील) 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: