गोवा 

‘पेडणेकरांना कधीही फसवणार नाही’

पेडणे ​(निवृत्ती शिरोडकर)​ :
प्रवीण आर्लेकर कधी कुणाला खोटी आश्वासने देत नाहीत, तर कृतीतून आपले कार्य करतो, गरजवंताना मदत करणे आपले परम कर्तव्य आहे. ज्याना गरज असते त्यांनी हाक मारली तर आपण त्याला प्रतिसाद देतो, गरज्वन्ताना मदत करणे हि ईश्वरसेवा आपण मानतो असे उद्गार मगोचे नेते प्रवीण आर्लेकर यांनी कोरगाव येथील लक्ष्मण कांबळी या नागरीकाला व्हिलचेर मोफत दिल्यानंतर ते बोलत होते.

पेडणेची जनता स्वाभिमानी जनता त्यांनी जर एकाध्यावेळी कुणाला शब्द दिला तर तो ती कायम स्वरूपी पाळणारी आहे. त्यामुळे आपण आता आणि पुढेही भविष्यात पेडणेकराना फसवणार नाही. अशी ग्वाही दिली.​

कोरगाव येथील लक्ष्मण कांबळी या नागरिकाचा एक पाय काढावा लागला होता. त्याला व्हिलचेरची गरज होती. या विषयी मगोचे नेते प्रवीण आर्लेकर यांच्या कानी हि गोष्ठ घातली. मगोचे नेते प्रवीण आर्लेकर यांनी विलंब न लावता नागरिकासाठी लगेच आरोग्य विषयक साहित्य प्रदान​ ​केले. या​वेळी पल्लवी आर्लेकर, मगोचे जेष्ठ कार्यकर्त्ये सुदीप कोरगावकर, प्रवक्ते उमेश तळवणेकर, नरेश कोरगावकर, सिथिया गावकर, जयेश पालयेकर आदी उपस्थित होते.

प्रवीण आर्लेकर यांनी बोलताना लक्ष्मण कांबळी यांच्या पाय काढून खूप वर्षे झाली.मात्र या मतदार संघातून निवडून आलेल्या आमदाराला कसलीच जाणीव नाही, आपल्या मतदाराना काय हवे काय नको यांची विचारपूस ते केवळ निवडणुकीवेळी करत असतात असा आरोप केला. आपले काम केवळ गरजवंताना मदत करणे एवढेच आहे. ज्याला मदत झाली त्याचे आशीर्वाद आम्हाला महत्वाचे आहे.

आपणास सुरुवातीला पेडणे मतदार संघात आपल्या समाजातील नागरिकांनी आणले. व आपल्याला जनसेवा करण्याची संधी दिली. मी कधी कुणाला खोटे आश्वासन देणार नाही तर कृतीतून कार्य करून दाखवणार असल्याचे सांगितले.


मतदारसंघात वीज पाणी बेरोजगारी हि प्रमुख समस्या आहे. माझ्या घरात वीज पाणी नसेल तर जनतेच्याही घरी वीज पाणी नसणार त्यामुळे मला समस्यांची जाणीव होणार त्यासाठी मी २४ तास आमदार होण्यापूर्वीच मतदार संघात वास्तव्य करत आहे. असे मगोचे नेते प्रवीण आर्लेकर यांनी सांगितले.

या पूर्वी पेडणे मतदार संघातून निवडून आलेले तालुक्या बाहेरच्या आमदारांनी आपण आमदार झाल्यानंतर मतदार संघात वास्तव्य करणार असे आश्वासन दिले मात्र त्यांनी कधी वास्तव्य केले नाही. मात्र प्रवीण आर्लेकर यांनी आमदार होण्यापूर्वीच धारगळ येथे घर स्वताचे उभारून ते वास्तव्य ३० रोजी पासून करणार आहे, यावेळी आर्लेकर याना पत्रकाराने छेडले असता, मतदार संघातील समस्या जाणीव आणि त्याचा अनुभव घेण्यासाठी वीज पाणी गायब कशी होते, याचा जवळून अनुभव घेता येईल मतदाराना २४ तास देण्यासाठी आपण मतदार संघात कायम स्वरूपी वास्तव्य करत आहे. असे आर्लेकर यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले.

मतदारसंघात कोणत्या समस्या आहे यांची जाणीव मडगाव येथे राहून कळणार नाही, असा टोला कुणाचेही नाव न घेता प्रवीण आर्लेकर यांनी मारला.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: