सातारा 

​सातारा जिल्हा बॅंकेत अजून एक महाघोटाळा उघड…

ऐन निवडणुकीच्या तोंडावर जिल्हा बॅंकेची लक्तरे वेशीवर...

​सातारा (महेश पवार) :
आंबेघर भोगवली विकास सेवा सोसायटी आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकार्यानी संगनमताने अनेक  शेतकर्यांच्या नावाने बोगस कर्ज प्रकरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे .यात जिल्हा बॅंकेचा शाखाधिकारी व  विकास सेवा सोसायटीचा सचिव यांसह अनेक राजकीय नेत्यांचा समावेश आहे.

गाव राजकारणा पासुन आमदारकी खासदारकी च्या निवडणुकीसाठी विकास सेवा सोसायटी जी शेतकऱ्यांच्या साठी अर्थवाहिनी समजली जाते त्यांच अर्थव्यवस्थेत राहून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे . हजारो शेतकरी या बँकेमध्ये आपली आवक जमा करीत असतात. मात्र, काही लुटारुंच्या कारनाम्यामुळे या बँकेला गळती लागल्याचेच नव्हेतर या बँकेशी कोणतेच सोयरसुतक ठेवू नये अशी भावना सामान्यांमध्ये निर्माण होवू लागल्याचे निर्माण झालं आहे .

जिल्हा मध्यवर्ती बेँक ही तशी पहायला गेली तर सर्वसामान्य शेतकर्‍यांची बँक म्हणून ओळखली जाते. हजारो शेतकरी आपल्या तुटपुंज्या मिळकतीमधून या बँकेत गुंतवणूक करतात. या शेतकर्‍यांना आपल्या गुंतवणुकीवर पूर्ण विश्‍वास असतो. या गुंतवणुकीच्या अनुषंगाने आपल्या जमापुंजीची खात्री त्या शेतकर्‍याला असते. मात्र, सातारा जिल्ह्यातील आंबेघर भोगवली येथील महेंद्र नारायण गोळे​, भिकाबाई नारायण गोळे या शेतकर्‍याच्या शेतीवर कोणत्याच प्रकारचे कर्ज न घेता सुध्दा त्याचे नाव कर्जदार यादीत आल्याने त्यांना मोठा धक्काच बसला आहे .

​अशा प्रकारे अनेक शेतकर्‍यांनी ज्यांनी जिल्हा बँकेचे कर्ज कधीच काढलेले नाही, अथवा सोसायटीची पायरीही चढली नासताना देखील, आंबेघर भोगवली येथे शेतकर्‍याच्या नावावर बोगस कर्ज काढल्याचा प्रकार घडल्याने , सहकार क्षेत्रात चांगलीच खळबळ माजली आहे….

या सर्व प्रकारांची तक्रार महेंद्र नारायण गोळे​, भिकाबाई नारायण गोळे यांनी मेढा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे आता पोलिस चौकशी करून गुन्हा दाखल करणार असल्याचे गोळे यांनी ​’​राष्ट्रमत​’​सोबत  ​बोलताना सांगितले ….

या संदर्भात जिल्हा बँकचे मुख्य कार्यकारी अधिकारी सरकाळे यांना ‘राष्ट्रमत’ने दुरध्वनीवर संपर्क साधला असता,  संबंधित दोषीवर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्टिकरण दिलं आहे.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: